घरIPL 2020IPL 2020: फायनलपूर्वी मुंबईच्या गोटात चिंता; प्रमुख गोलंदाज जायबंदी

IPL 2020: फायनलपूर्वी मुंबईच्या गोटात चिंता; प्रमुख गोलंदाज जायबंदी

Subscribe

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. गेले चार वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या तेराव्या मोसमात देखील सुरुवातीपासून प्रबळ दावेदार मानले जात आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला हरवत अंतिम सामन्यात थेट प्रवेश केला आहे. येत्या १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. मुंबई अंतिम सामना कोणासोबत खेळणार हे दोन सामन्यांनंतर ठरणार आहे. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी मुंबईला धक्का बसला आहे.

मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्ट दिल्लीच्या सामन्यावेळी जखमी झाला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबईसाठी बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बोल्टने भेदक गोलंदाजी केली. मात्र, दोन षटके टाकल्यानंतर तो मैदानाबोहेर बाहेर गेला. आता अंतिम सामन्यापूर्वी बोल्ट जखमी झाल्यामुळे रोहित आणि मुंबईच्या चिंतेत वाढ झाली आहे.

- Advertisement -

जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या जोडीने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. बुमराह आणि बोल्ट या जोडीने आयपीएलच्या १३ व्या हंगामात ४९ विकेट घेतल्या आहेत. बोल्टने १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पहिल्याच षटकात बोल्टने दोन फलंदाजांना भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. बोल्टने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला शून्य धावेवर बाद केले. यानंतर बोल्टने केवळ एक षटकच टाकले. दोन षटके टाकल्यानंतर बोल्ट जायबंदी झाल्यामुळे मैदानाबाहेर गेला, तो सामना संपेपर्यंत मैदानात आलाच नाही. बोल्टची दुखापत किती गंभीर नसल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १४ व्या षटकांत श्रेत्ररक्षण करताना groin injury मुळे बोल्ट मैदानाबाहेर गेला. फायनलपूर्वी बोल्ट जखमी झाल्यामुळे मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा बोल्टच्या अंतिम सामन्यात खेळण्याबद्दल आशावादी आहे. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “मी बोल्टला पाहिले असून मला तो ठीक वाटला. मला नाही वाटत की बोल्टची दुखापत तेवढी मोठी आहे. दोन-तीन दिवसांची विश्रांती घेऊन तो नक्कीच परतेल.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -