घरIPL 2020MI vs RCB: 'सूर्या' तळपला; मुंबईचा बँगलोरवर ५ गडी राखून विजय

MI vs RCB: ‘सूर्या’ तळपला; मुंबईचा बँगलोरवर ५ गडी राखून विजय

Subscribe

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ५ विकेट्सने हरवत प्ले-ऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. RCB च्या १६५ धावांचं आव्हान MI ने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या विजयात सूर्यकुमार यादवची मोलाची भूमिका आहे. सूर्यकुमार यादवने ७९ धावांची झणझणीत खेळी केली.

अबू धाबी येथे झालेल्या या सामन्यात मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत पुन्हा पोलार्डने मुंबईचे कर्णधारपद भूषवले आणि त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. बंगळुरूच्या डावाची चांगली सुरुवात झाली. त्यांचे सलामीवीर जॉश फिलिपे आणि देवदत्त पडिक्कल यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे पॉवर-प्लेमध्येच बंगळुरूच्या ५० धावा पूर्ण झाल्या.

- Advertisement -

फिलिपेने यानंतर धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ३३ धावांवर राहुल चहरने बाद केले. बुमराहने कर्णधार विराट कोहलीला केवळ ९ धावा करू दिल्या. तर एबी डिव्हिलियर्स १५ धावा करून बाद झाला. पडिक्कलने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ४५ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. अखेर त्यालाही बुमराहने माघारी पाठवले. यानंतरच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे बंगळुरूला २० षटकांत ६ बाद १६४ धावाच करता आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -