घरIPL 2020DC vs SRH: दिल्लीमुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात; अंतिम सामना मुंबई आणि दिल्लीत

DC vs SRH: दिल्लीमुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात; अंतिम सामना मुंबई आणि दिल्लीत

Subscribe

इंडियन प्रिमियर लिगच्या १३ व्या हंगामाचा विजेता संघ आता एक सामना दूर आहे. १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सची लढत आता दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान झालेल्या सामन्या दिल्लीने हैदराबादचा १७ धावांनी पराभवर करत पुन्हा मुंबईसमोर आव्हान उभे केले आहे. क्वालिफायर १ मध्ये मुंबई आणि दिल्ली भिडली होती. मात्र दिल्लीचा जोरदार पराभव करत मुंबईने अंतिम फेरी गाठली होती. मात्र आता दिल्लीने पुन्हा एकदा आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरलेल्या पृथ्वी शॉला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याजागी शिमरोन हेटमायरला संघात स्थान दिले गेले होते. दिल्लीने आज सलामी जोडीत बदल करत शिखर धवनसोबत मार्कस स्टॉयनिसला पाठवले होते. संघाचा हा निर्णय दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी सार्थ ठरवत ८.२ षटकात ८६ धावांची भागिदारी रचली. स्टॉयनिसने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. तर शिखर धवनने ५० चेंडूत ७८ धावा मिळवल्या. कर्णधार श्रेयस अय्यर फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. त्याने २० चेंडूत अवघ्या २१ धावा केल्या. तर आज संधी मिळालेल्या हेटमायरने २२ चेंडूत ४२ धावा ठोकल्या. यामुळे दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात तब्बल १९० धावांचे आव्हान सनरायझर्स हैदराबादसमोर उभे केले होते.

- Advertisement -

सनरायझर्सच्या डावाची सुरुवात तितकी चांगली झाली नाही. हैदराबादने देखील आज सलामी जोडीत बदल केला होता. कर्णधार डेव्हिड वॉर्नर सोबत प्रियम गर्ग फलंदाजीसाठी उतरला होता. पहिल्या षटकात प्रियमने चांगले फटके खेळले. मात्र दुसऱ्याच षटकात दिल्लीचा चॅम्पियन गोलंदाज रबाडाने वॉर्नरचा त्रिफळा उडविला. हैदराबादचा आधारस्तंभ वॉर्नर लवकर बाद झाल्यामुळे डावाची सुरुवात हळुवार झाली. त्यानंतर पाचव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मार्कस स्टॉयनिसने एकाच षटकात प्रियम गर्ग आणि मनिष पांडे यांना बाद केले.

तीन विकेट स्वस्तात गेल्यानंतर सनरायझर्सची भरोश्याची जोडी केन विल्यमसन आणि जेसन होल्डर मैदानात उतरले. दोघांनीही ४६ धावांची भागिदारी रचली. मात्र त्यानंतर होल्डर १२ व्या षटकात बाद झाला. केन विल्यमसनने एका बाजूने फटकेबाजी सुरु ठेवत ४५ चेंडूत ६७ धावा ठोकल्या. मात्र तो देखील स्टॉयनिसचा बळी ठरला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या रचता आली नाही. अखेर दिल्ली कॅपिटल्सने १७ धावांनी हा सामना जिंकला. रबाडाने ४ विकेट मिळवत पुन्हा एकदा पर्पल कॅपवर आपले नाव कोरले आहे. आता अंतिम सामन्यात रबाडा विरुद्ध बुमराह असाही पर्पल कॅपसाठीचा सामना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -