गुळा सोबत फुटाणे खाल्ल्याने ‘हे’ होतात फायदे

गुळ-फुटाणे खाल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा भर पडण्यास मदत देखील होते. अनेक आजारांवर मात करण्यासाठी गुळ-फुटाणे फायदेशीर आहेत.

बदल्या जीवनशैलीत माणसांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी या बदल चालल्या आहेत. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने स्वत:ला खाणाच्या सवयी लावत असतात. तरूण मंडळी डाएटीशियनकडून खास डाएट तयार करून ते पाळताना दिसतात. मात्र, आरोग्य संबंधितल्या जुन्या परांपरा आजच्या पिढीतील लोकांना आवडत नाही. पण जुन्या परंपरातील आरोग्याचा सल्ला हा महत्वपूर्ण ठरतो. जुन्या काळात घरी आलेल्या पाहुणांना पिण्यास गुळ आणि पाणी दिले जायचे, तर खाण्यासाठी गुळ आणि फुटाने दिले जायचे. यापूर्वीच्या पिढीतील व्यक्तींमध्ये इच्छाशक्ती वाढवण्याची तसेच रोगावर मात करण्याची ताकद होती. गुळ-फुटाणे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या नष्ट होतात. गुळ-फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा फरक पडताना दिसते. तसेच गुळ-फुटाणे खाण्याचे या व्यतिरिक्त अधिक फायदेसुद्धा आहेत.

गुळ-फुटाणे खाण्याचे फायदे

चेहरा उजळण्यास मदत

गुळ-फुटाणे यामध्ये झिंग म्हणजेच जस्त असते. जस्त हे चेहरा उजळण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या सौंदर्यात अधिक वाढ होताना दिसते. ते खल्ल्याने टॉक्सिन्स दूर होतात आणि त्यामुळे सुंदरता उजळण्यात मदत मिळते.

अपचनापासून मुक्ती-

गुळ-फुटाणे नियमित खाल्याने अॅसिडीटी आणि अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळते. ते खाल्लाने पचनशक्ती सुधारते. सर्वाधिक स्त्रियांना पोटाचे विकार होतात. अशा वेळी गुळ-फुटाणे खाणे योग्य ठरते. यामुळे अपचनाचा त्रास कमी होतो. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बचाव होतो.

दातांची सुरक्षा राखण्यासाठी-

गुळ-फुटाण्यामधील फॉस्फरस हे दातांसाठी उपयोगी आहे. ते खाल्ल्याने दात सुरक्षित राहण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी-

ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत. त्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते खाल्याने हृट अटॅकच्या समस्या दूर केली जाऊ शकते.

सर्दी-पडस्यावर मात-

गुळ-फुटाणे नियमित खाल्याने सर्दी-पडस्यावर मात केली जाऊ शकते. हे खाल्ल्याने शरीरातील इम्यूनिटी पावर वाढण्यास मदत होते. तर सर्दी-पडस्यापासून आरामसुद्धा मिळते.

डायबिटीजमध्ये मदत-

गुळ-फुटाणे नियमित खाल्याने डायबिटीज या आजाराशी लढण्यास मदत होते. हे खाल्ल्याने रक्ता मधील साखरेची पातळी स्थिर राहते. तर डायबिटीजपासून बचावसुद्धा होते.

जॉइंट पेन रोखण्यास मदत-

गुळ-फुटाणे नियमित खाल्याने जॉइंट पेनपासून आराम मिळते. यामध्ये कॉल्शियम असते त्यामुळे हाटे मजबूत होतात. यामुळे जॉइंट पेनया समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होते.