प्रत्येक घरा-घरात उन्हाळा सुरु झाला की उन्हाळ्याची काम सुरु होतात. घरातील स्त्रिया पापड, कुरडई, लोणची करण्यात बिझी होऊन जातात. यासाठी महिला तत्पर असतात. विशेष म्हणजे घरातील इतर कामं सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच असते.
विशेष म्हणजे उन्हाळ्यात केलेले कुरड्या, पापड हिवाळा येईपर्यंत लगेच संपूनही जातात. त्यामुळेच आज आपण कुरड्यांची अशी एक रेसिपी पाहणार आहोत जी कोणत्याही ऋतुमध्ये सहज करता येते.
- Advertisement -
साहित्य –
- बारीक रवा – १ वाटी
- पाणी – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
- सोडा – चिमुटभर
कृती –
- प्रथम रवा नीट निवडून घ्या आणि दिवसभर पाण्यात भिजवून ठेवा. (रव्याच्या वर पाणी येईल इतकं पाणी घ्या.)
- दुसऱ्या दिवशी रव्याच्या वरचं पाणी काढून टाका व रवा छान फेटून घ्या.
- आता दुसऱ्या पातेल्यात एक वाटी पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा.
- या पाण्यात अंदाजे मीठ व जरासा सोडा घाला आणि छान उकळी आणा.
- पाण्याला एक उकळी आल्यानंतर घोटलेला रवा या पाण्यात टाका व मिक्स करुन घ्या.
- आता पातेल्यावर झाकण ठेऊन रव्याला एक वाफ काढा.
- जर रवा जास्तच चिकट वाटत असेल तर अंदाजे हळूहळू पाणी मिक्स करा.
- अशा प्रकारे रव्याचा एक घट्ट गोळा तयार होतो.
- त्यानंतर तुमच्या आवडीनुसार, या रव्याच्या कुरड्या करा.
- Advertisement -
हेही वाचा :