Sunday, June 11, 2023
घर मानिनी चैत्र नवरात्री विशेष : 'या' सोप्या पद्धतीने घरी बनवा सीताफळ रबडी

चैत्र नवरात्री विशेष : ‘या’ सोप्या पद्धतीने घरी बनवा सीताफळ रबडी

Subscribe

रबडी ह एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे. कोणताही सण किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी रबडी बनवली जाते. दुधापासून बनवलेली रबडी तुम्ही खाल्ली असेलच.

रबडी ह एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे. कोणताही सण किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी रबडी बनवली जाते. दुधापासून बनवलेली रबडी तुम्ही खाल्ली असेलच.

पण आज आम्ही तुमच्यासाठी कस्टर्ड अॅपलपासून (सीताफळ) बनवलेल्या रबडीची रेसिपी घेऊन आलो आहोत. उपवासाच्या वेळी तुम्ही सीताफळ रबडी बनवू शकता, जी तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

- Advertisement -

सीताफल रबड़ी (custerd apple rabdi recipe in Hindi) रेसिपी बनाने की विधि in Hindi by Parul Manish Jain - Cookpad

 

- Advertisement -

साहित्य-

 • 2/3 मोठे सीताफळ
 • 1 लिटर दूध
 • 5/6 बदाम
 • केसर (चवीनुसार)
 • 2/3 कप साखर
 • 1 टि स्पून वेलची पावडर

कृती-

 • सर्वप्रथम सीताफळाच्या बिया काढून स्वच्छ करा.
 • बिया काढलेले फळ स्वच्छ धुवून घ्या.
 • या फळातील मलाई काढण्यासाठी हाताचा वापर करा.
 • ते सुकल्यावर सीताफळ थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
 • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फ्रीजशिवायही वापरू शकता.
 • एका कढईत दूध टाकून ते मंद आचेवर उकळवा आणि उकळी आली की गॅस मंद करा.
 • यानंतर दूध घट्ट होऊ द्या. या दरम्यान दूध सतत ढवळत राहा.
 • आता साखर आणि केशर मिक्स करून 5 ते 10 मिनिटे चांगले शिजू द्या.
 • चांगली उकळी आल्यावर आच मंद करा आणि सीताफळ घातल्यावर 15 ते 20 मिनिटे सतत ढवळत राहा.
 • आता गॅस बंद करा आणि दूध पूर्णपणे थंड होऊ द्या.
 • तसेच त्यावर वेलची पूड टाका, चांगले मिसळा आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

हेही वाचा :

पौष्टिक आणि खमंग कच्च्या केळाची टिक्की नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini