Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship तुमच्यात 'हे' गुण असतील तरच मिळतो सन्मान

तुमच्यात ‘हे’ गुण असतील तरच मिळतो सन्मान

Subscribe

जर तुम्ही चुक केली असेल तर वाद घालण्याऐवजी ती सुधारल्याने तुमचा सन्मान वाढला जाईल. परंतु ही बाब सर्वच ठिकाणी लागू होते असे नाही. काहीवेळेस स्वत:ला खरं ठरवणे सुद्धा महत्त्वाचे असते. (Habits to get respect tips)

आत्मसन्मान जपा
जर तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपा. कारण एखाद्याला तुम्ही ऐवडी संधी देऊ नका की, तुमच्या आत्मसन्माला ठेच पोहचवेल.

- Advertisement -

मतावर ठाम रहा
तुम्ही तुमच्या मतावर ठाम रहा. यामुळे दुसऱ्यांना दाखवून देऊ शकता की, तुमच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. जी लोक आज एक दुसऱ्या दिवशी एक बोलतात अशा लोकांचा कोणीही सन्मान करत नाही. त्याचसोबत त्यांना कोणीही पसंद सुद्धा करत नाहीत.

कारणे देणे टाळा
कोणत्याही गोष्टीसाठी कारणे देऊ नका. कोणतेही काम असो, एखाद्याला वेळ द्यायची असो अथवा भेटण्यासाठी जायचे असेल. जर जमत नसेल तर स्पष्टपणे नकार द्या पण कारणे देऊ नका. कारणे देणाऱ्या लोकांसोबत कोणीही राहत नाही.

- Advertisement -

लोकांचा आदर करा
जर तुम्हाला इतरांकडून सन्मान हवा असेल तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना सन्मान देण्यास शिका. कोणत्याही वयाचा व्यक्ती असतो त्याच्याशी आदराने, नम्रपणे बोला. त्यांना सन्मान दिला तरच तुम्हाला सुद्धा सन्मान मिळेल.

जबाबदार व्हा
आपल्या कामाप्रति जबाबदाऱ्या समजून घ्या. कारणे देऊन आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळू नका. त्याऐवजी जबाबदाऱ्या घेण्यास शिका. यामुळे लोक तुमचा सन्मान करतील.

शेअरिंग करा
आपण घरात एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो. जर तुम्ही घराबाहेर सुद्धा असेच वागलात तर दुसऱ्यांच्या नजरेत तुमचा सन्मान वाढला जाईल.


हेही वाचा- नकार देण्यास संकोच वाटतो, मग वापरा या ट्रीक्स

- Advertisment -

Manini