Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Beauty साबणाने चेहरा धुत असाल तर आधी हे वाचा

साबणाने चेहरा धुत असाल तर आधी हे वाचा

Subscribe

बहुतांश लोल आपला चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात. मात्र काहीजण साबणानेच फेस स्वच्छ करतात. परंतु साबणाने चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्याची स्किन खराब होऊ शकते. भले साबण एक पॉवरफुल क्लिंजर आहे. पण तरीही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य यामुळे बिघडू शकते. (soap use for skin)

काही स्किन स्पेशालिस्ट साबण हा सर्वाधिक खराब स्किन प्रोडक्ट्सपैकी एक असल्याचे सांगतात. तुमची स्किन, चेहऱ्याची चमक यामुळे बिघडू शकते. दररोज चेहऱ्याला साबण लावत असाल तर असे करणे बंद करा. तुमची स्किन कोरडी, निस्तेज होऊ शकते. त्याचसोबत ओलसरपणा ही निघून जाईल.

- Advertisement -

-चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे
साबणात असलेले केमिकल्स टॉक्सिन्स, बॅक्टेरिया आणि अन्य खराब पार्टिकल्सला स्किनच्या लेअर्समध्ये खोलवर जाऊ देतात. हेच कारण आहे की, स्किनला नुकसान पोहचवू शकते. चेहऱ्यावर साबणाचा सातत्याने वापर केल्याने रेडनेस, ड्रायनेस, जळजळ, खाज आणि सुरकुत्या येऊ शकतात.

-स्किनला माइक्रोबायोमला नुकसान पोहचते
त्वचेला विविध प्रकारचे रोगजनक आढळतात. जे स्किनच्या लेयर्सला हार्मफुल बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसच्या अटॅक पासून बचाव करतात. त्यांना स्किन माइक्रोबायोमच्या रुपात ही ओळखले जाते. साबणात असलेले केमिकल्स स्किनची अॅसिडिटी कमी करतात. हेच कारण आहे की, त्वचेवर सूज, इंन्फेक्सन आणि पिंपल्स अशा समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

-स्किनवरील पोर्स ब्लॉक होतात
साबणाने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात. स्किन एक्सपर्ट्सच्या मते, असे अशा कारणास्तव होते की, बहुतांश साबणात फॅटी अॅसिड असतात. जे स्किन पोर्स मध्ये जाऊन जमा होतात आणि त्यांना ब्लॉक करतात. याच कारणास्तव ब्लॅकहेड्स, ब्रेकआउट, इंन्फेक्शनसारख्या समस्या होऊ शकते.


हेही वाचा- घरात असलेल्या ‘या’ गोष्टींपासून बनवा स्क्रब, मिळेल चमकदार त्वचा

- Advertisment -

Manini