घरलाईफस्टाईलकाळ्या ओठांना गुलाबी करा

काळ्या ओठांना गुलाबी करा

Subscribe

या घरगुती उपायांमुळे काळे ओठ होतील गुलाबी

काळे ओठ सौंदर्यामध्ये बाधा आणतात. हे काळे ओठ गुलाबी करण्यासाठी सौंदर्य प्रसाधनाचा वापर करतात. मात्र यामुळे ओठ गुलाबी होत नाही तर ओठांना यामुळे अधिक बाध होते. मात्र घरगुती उपाय केल्यास काळे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

  • काळ्या ओठांवर मध, कोरफडीचा गर आणि स्ट्रॉबेरीचा रस एकत्र करुन हे मिश्रण ओठांना लावून १० मिनिटांनी ओठ धुऊन घ्या. यामुळे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.
  • लिंबूचा रस आणि ग्लिसरीन एकत्र करुन हे मिश्रण रात्री झोपताना ओठांना लावा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
  • ओठांवर पुदीन्याचा रस लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.
  • मध आणि लिंबूचा रस एकत्र करुन ओठाला लावावा यामुळे ओठांना गुलाबी रंग येतो.
  • ऑलिव्ह ऑइल आणि साखर एकत्र करुन ओठांवर चोळल्याने ओठांचा काळा रंग कमी होतो.
  • गुलाबाच्या पाकळ्या आणि ग्लिसरीन एकत्र करुन हे मिश्रण ओठांना लावावे यामुळे ओठ गुलाबी होतात.
  • काकडी किंवा बटाट्याच्या तुकड्याने ओठ चोळावे यामुळे ओठांचा काळा रंग कमी होण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -