अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- Advertisement -
- आलं फ्रीजमध्ये ठेवलं तरी बऱ्याचवेळा खराब होतं. ते चांगलं रहावं म्हणून त्याची माती चोळून स्वच्छ धुवून टाकावी. नंतर दिवसभर फडक्यावर पसरून सावलीत वाळवावे आणि झिप लॉक पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे. महिनाभर सहज टिकते.
- दुधाच्या भांड्यात दूध सोडण्यापूर्वी थोडेसे पाणी घालावे आणि मगच दुधाची पिशवी ओतावी म्हणजे दूध तापल्यावर भांड्याच्या तळाला चिकटून करपत नाही.
- वर्षाभराचे लोणचे भरून ठेवलेल्या बरणीतून वापरासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये, लोणचे लवकर खराब होते.
- लसूण सोलून झाल्यावर हाताचा वास जात नसेल तर आगोदर हाताला थोडीशी टुथ-पेस्ट चोळून मग हात धुतल्यास लसणाचा वास जातो.
- दूध तापवताना उतू जात असेल तर किंवा लोणी काढते वेळी उतू जात असेल तर त्यावर थोडेसे पाणी शिपडावे. दोन्ही उतू जात नाहीत.
- पालक किंवा कोथिंबीर यांचा ताजेपणा टिकावा यासाठी एखाद्या वर्तमानपत्रात गुंडाळून जाळीच्या डब्यात फ्रिजमध्ये ठेवावे.
- फ्रीज उघडल्यावर फ्रिजमधून कुबट वास येत असेल तर फ्रिजमध्ये दोन लिंबे अर्धी कापून फ्रिजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावीत. काही वेळात कुबट वास येणे बंद होईल.
- कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदा कापून त्याच्या दोन फोडी करून दहा मिनिटे गार पाण्यात टाकून ठेवा आणि मग कांदा चिरायला घेतल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही.
- चहा करताना किसलेले आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो.
- पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो. चवही चांगली येते.
हेही वाचा :