Workout Tips: व्यायाम करायला तासनतास वेळ नाही? २ मिनिटांच्या ‘या’ टिप्सने ठेवा स्वतःला फीट

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आणि सकस आहारासोबतच कसरत करणे देखील अत्यंत गरजेचे असते. असे काही व्यायामाचे प्रकार आहेत जे तुम्ही केवळ '२' मिनिटांत करू शकता.

gym workout
व्यायाम

अनेक व्यक्ती आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत असतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आणि सकस आहारासोबतच कसरत करणे देखील अत्यंत गरजेचे असते. अनेक जण रोजच्या रोज व्यायाम करतात. पण काहींना व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून आज आपण अश्याच काही व्यायामाच्या काही टिप्स(fitness tips) जाणून घेणार आहोत, ज्या टिप्स तुम्ही रोजच्या तुमच्या व्यायामात वापरू शकता. आणि त्या साठी तुमचा फार वेळ सुद्धा लागणार नाही. ‘या’ अशा व्यायामाच्या टिप्स तुम्ही केवळ ‘२’ मिनिटात करू शकता आणि ज्या तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

आणखी वाचा –  Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

आणखी वाचा – Momos Recipe : घरच्या घरी बनवा चटपटीत व्हेज मोमोज

व्यायाम कारण्याचे अनेक फायदे असतात. व्यायामाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्याचबरोबर व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वात उत्तम असते. पण सकाळची सगळी धावपळ आणि गडबड या सगळ्यातच व्यायामाला पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. पण व्यायाम न करण्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. आणि त्यामुळे अनेक आजार देखील संभविण्याची शक्यता असते. पण या सगळ्यात रोजची कामं सांभाळून आणि शरीराराची काळजी घेऊन असे काही व्यायामाचे प्रकार आहेत जे तुम्ही केवळ ‘२’ मिनिटांत करू शकता. त्यासाठी ही बातमी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकते.

 

आणखी वाचा – फ्रीजमधून येत असेल दुर्गंधी तर वापरा ‘या’ टिप्स

आणखी वाचा – पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचविण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

१. हाय निज (high knees)

हाय निज हा एक अतिशय उत्तम कार्डिओ वर्कआउट आहे, की ज्यामुळे तुमचे हृदय सुद्धा निरोगी राहते. याव्यतिरिक्त या व्यायामामुळे तुमच्या शरीरातील लोअर बॉडीला एक चांगला आकार राहतो. या व्यायामाच्या साहाय्याने तुम्ही भरपूर कॅलरीज बर्न करू शकता.

आणखी वाचा – Be careful : ‘फ्रुट शेक’ पिणे किती फायदेशीर? वाचा काय सांगतं ‘आयुर्वेद’

 

२. जंपिंग जॅक (jumping jacks)

या व्यायामाने शरीराला चांगले फायदे मिळतात. हा व्यायाम करताना हात आणि पायांना चालना मिळते/. त्यामुळे हातामधील आणि पायामधील स्नायू बळकट होतात. या व्यायामाने हृदय सुद्धा निरोगी राहतं आणि वजन सुद्धा झपाट्याने कमी होते.

 

३. स्क्वॅट्स (squats)

 

या व्योमाणे शरीरातली अनेक अवयवांना एकाच वेळी चालना मिळते. त्याचसोबत या व्यायामाने क्लॅरीज सुद्धा बर्न होतात. या व्यायामामुळे पायांचे स्नायू दखल बळकट होतात.

आणखी वाचा – रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

४. माउंटेन क्लायंबर (mountain climber)

या व्यायामाने स्नायू आणि सांधे यांचा चांगला व्यायाम होतो. त्यांना बळकटी मिळते. संपूर्ण शरीरासाठी हा व्यायाम उत्तम ठरतो. त्यामुळे या सर्व प्रकारच्या व्यायामाच्या प्रकारामुळे तुमचा वेळही वाचू शकतो आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेऊ शकता.

 

या संदर्भातील अधिकची माहिती तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या शरीराप्रमाणे कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवू शकता.