घरलाईफस्टाईलमहाराष्ट्रातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

महाराष्ट्रातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

Subscribe

राज्यातील काही ठराविक पर्यटन स्थळांना आवर्जुन भेट द्यावी. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रेक्षणिय अशी ही ठिकाणी पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र बनली आहेत.

संस्कृती आणि परंपरांनी परिपूर्ण असे आपले राज्य आहे. प्रामुख्याने पर्यटक येतात आणि केवळ महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला भेट देतात. मात्र राज्याताली अशी काही ठिकाण आहेत ज्याला आवर्जुन भेट द्यायलाच हवी. राज्यातील अशा काही ठिकाणांची माहिती आपण करून घेणार आहोत, ज्याबाबत राज्याबाहेरील पर्यटकांना फारशी माहिती नसते.

  • तुळजापूर

सोलापूरमधील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या श्री तुळजापूर भवानी मातेच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या देवस्थानाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त आहे. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळ आहेत. त्याशिवाय धार्मिक लोकांसाठीही येथे मंदिर आणि तीर्थ क्षेत्राची कमी नाही. पुरातन काळापासूनची गुहा आणि लेण्या या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळतील.

- Advertisement -
tuljabhavani temple
श्री तुळजाभवानी मंदिर
  • बागलकोट

सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील बागलकोट हेदेखील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हे महत्त्वाचे शहर मानले जात आहे. या ठिकाणाचे प्राचिन काळातील नाव हे बगाडिगे असे होते. या जागेचे महत्त्व पौराणिक काळाशी देखील जोडले गेले आहे. हे शहर रावणाने एका भजन मंडळींना दिले होते, असी दंतकथा आहे. इथे कित्येक शक्तीशाली राजवंशज होऊन गेले आहेत. यामध्ये पेशवा, मैसूर, मराठा, विजयनग आणि इंग्रज यांचा समावेश आहे. या शहरात तुम्हाला जैन मंदिर, विरुपाक्ष मंदिर, बादामी गुफा, रावणपहाडी गुफा, पुरातत्व संग्रहालय यांचा समावेश आहे.

बागलकोटमधील जैन मंदिर
  • चांदोली अभयारण्य

मंढूर जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेले चांदोली अभयारण्य हे राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रात आल्यावर या ठिकाणी जाण्याचा नक्की प्लॅन करा. हे राज्यातील सर्वाधीक लोकप्रीय वन्यप्राण्याचे उद्यान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांचा रेलचेल असते. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ३१७.६७ वर्ग किमी आहे. या ठिकाणी कित्येक प्राणी, वनस्पती, पक्षांचा वावर आहे.

- Advertisement -
chandoli forest
चांदोली अभयारण्य
  • विजयपूर

सोलापूर जिल्ह्याच्या नजीक असलेल्या कर्नाटकमधील विजयपूर शहराला नक्की भेट द्या. विजयपूरला बीजापूर या नावानेदेखील ओळखले जाते. या शहरात बीजापूरचा किल्ला, जामिया मस्जिद, इब्राहिम रौजा मकबरा, मेहतर महल, सात मंजिल, ताज बावडी, गोल गुंबज, नारी महल, मलिक-ए-मैदान या ठिकाणांना पर्यटक भेट देऊ शकतात.

Gol-Gumbaz
गोल गुंबज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -