उन्हामुळे चेहरा टॅन झालाय, मग वापरा द्राक्षापासून बनवलेले ‘हे’ पाच फेस पॅक

5 Best Homemade Grape Face Packs

प्रत्येक ऋतुनुसार त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणारा घाम आणि टॅनिंग यामुळे चेहऱ्यावर विपरित परिणाम होता. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगितले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा तजेलदार, स्वच्छ राहण्यासाठी फेस पॅकची गरज असते. आज आम्ही तुम्हाला द्राक्षापासून पाच फेस पॅक कसे बनवण्याचे, जे उन्हाळ्यात फायद्याचे ठरतील, हे सांगणार आहोत.

द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीचा फेस पॅक

यासाठी द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी एका बाउलमध्ये घ्या आणि ते स्मॅश करा. मग त्यामध्ये एक चमचा दही घाला आणि हा फेस पॅक चेहऱ्यावर, मानेवर लावा. कमीत कमी २० मिनिटे हा फेसपॅक लावून ठेवा. २० मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

दही आणि द्राक्षाचा फेस पॅक

चार पाच द्राक्ष घ्या आणि ते स्मॅश करा. मग त्यामध्ये एक चमचा दही घाला. त्यानंतर चेहऱ्यावर हा फेस पॅक लावून २० मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.

द्राक्ष आणि दहीचा फेस फॅक

या फेस पॅकमध्ये द्राक्षाची सालं काढून घेऊन ते स्मॅस करा आणि त्यामध्ये एक चमचा दही घाला. मग त्यामध्ये काही थेंब लिंबू पिळा. त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि सुखल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

द्राक्ष आणि कीवीचा फेस पॅक

द्राक्ष आणि कीवीचे एकच प्रमाण घेऊन ते बारीक करा. मग ते व्यवस्थित गाळू घेऊन मिस्क करा. त्यानंतर चेहऱ्यावर लावून थोडा वेळ ठेवून चेहरा धुवून घ्या.

द्राक्ष आणि सफरचंदाचा फेस पॅक

यात सफरचंदाची सालं काढा. मग त्याची पेस्ट करून त्यानंतर द्राक्षाचे पल्प घाला. दोन्ही व्यवस्थितरित्या मिक्स करून ते चेहऱ्यावर लावा. कमीत कमी अर्धा तास हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा.

अशा प्रकारे आम्ही सांगितलेले फेस पॅक रोज लावल्यामुळे चेहरा स्वच्छ होईल आणि तजेलदार राहिल.


हेही वाचा – Recipe : नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे धिरडे आणि कुटुंबाला करा खूश