एकदम सोप्पी रेसिपी! क्रंची, स्पायसी आणि चिझी फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे बनवाल?

क्रंची, स्पायसी, चिझी असलेला हा पदार्थ स्नॅक्स कॉर्नर, रेस्टॉरंटमध्ये मिळतो. पण तुम्हाला घरच्या घरीही असंच फ्राईज बनवायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत. त्या टीप्स फॉलो करा आणि घरच्या घरी फ्राईज बनवा.

मूड कोणताही असो, वातावरण कसलंही असो फ्रेंच फ्राईज खायला कोणाला नाही आवडत? अगदी कमी कालावधीत हा विदेशी पदार्थ भारतीयांच्या जीभेवर रेंगाळला आहे. क्रंची, स्पायसी, चिझी असलेला हा पदार्थ स्नॅक्स कॉर्नर, रेस्टॉरंटमध्ये मिळतो. पण तुम्हाला घरच्या घरीही असंच फ्राईज बनवायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत. त्या टीप्स फॉलो करा आणि घरच्या घरी फ्राईज बनवा. (5 Cooking Tips To Make Perfect Crispy French Fries At Home)

त्याआधी फ्रेंज फ्राईजचा थोडा इतिहास जाणून घेऊयात! असे म्हणतात की बटाटे तळण्याची सुरुवात फ्रान्स आणि उत्तर बेल्जियमच्या आसपासच्या ठिकाणी सुरू झाली. बेल्जियमच्या मॉस व्हॅलीजवळ एक गाव होतं, जिथे लोक नदीतील मासे तळून खायचे. मात्र, हिवाळ्यात नद्या गोठायच्या. त्यांचं बर्फात रुपांतर व्हायचं. त्यामुळे मासे मिळणे कठीण व्हायचं. त्यावेळी, उत्तर बेल्जियमच्या आसपासच्या काही गावांतील लोकांनी बटाटे तळण्यास सुरुवात केली. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील लोक बटाटे लहान माशांच्या आकारात कापून तेलात तळून खात असत. अशाप्रकारे फ्रेंच फ्राइजचा जन्म झाला.

हेही वाचा – Recipe : मूग डाळीचा चविष्ट आणि पौष्टिक समोसा नक्की ट्राय करा

१७ व्या शतकाच्या आसपास फ्रेंच क्रांतीदरम्यान सैनिकांना फ्रेंच फ्राईज खायला दिले जायचे. फ्रान्समधील प्रसिद्ध पॅरिसियन पुलाच्या नावावरून त्याला फ्राइट्स पॉंट न्युफ असं नाव पडलं. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा अमेरिकन आर्मी इथे आली तेव्हा त्यांना या खाद्यपदार्थाची माहिती मिळाली आणि त्यांना ते खूप आवडले. त्यांनी प्रथम ते केचप, मेयोनिज आणि व्हिनेगरसह खायला सुरुवात केली आणि त्याला फ्रेंच फ्राईज असे नाव दिले.

आता जाणून घेऊया क्रिस्पी फ्राईज कसे बनवावेत.

बटाट्यांचा आकार किती असावा

फ्रेंच फ्राईजचा आयडिल आकार आहे १/४ इंच. त्यामुळे कापताना त्याच आकारात बटाटे कापले गेले पाहिजेत. प्रत्येक हॉटेल, स्नॅक कॉर्नर आणि रेस्टॉरंटमध्ये याच आकारात फ्राईज मिळतात.

हेही वाचा – श्रावणातले उपवासही होतील आणि वजनही कमी होईल, ‘हे’ पदार्थ उपवासाला नक्की खा

थंड पाण्यात काप ठेवा

बटाटे योग्य आकारात कापून झाल्यानंतर साधारण आपण गरम पाण्यात ते काप उकळायला ठेवतो. मात्र, असं न करता थंड पाण्यात हे काप ठेवावेत. सात ते आठ मिनिटे हे काप थंड पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ते काप पुसून घ्यावे.

उकळत्या तेलात तळा

बटाटाच्या कापातील पाणी पुसून घेतल्यानंतर उकळत्या तेलात अवघ्या ५० सेकंदासाठी तळून घ्या. तळून झाल्यानंतर एका पेपर टॉवेलमध्ये ते ठेवा आणि थंड होऊ द्या.

हेही वाचा – ना जिम ना वर्क आऊट, फक्त फिस्ट डाएटने करा ‘वेट लॉस’

फ्रीज करा

अर्धवट तळलेले हे काप पूर्णतः सुकल्यावर त्यांना एका कंटनेरनमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून त्यांचा आकार तयार होऊ शकेल. व्यवस्थित फ्रीज केल्याने ते कुरकुरीत बनतात.

आता व्यवस्थित तळून घ्या

बटाट्याची कापं सुपर क्रिस्पी होण्यासाठी ही प्रोसेस केली जाते. फ्रीजरमधून कापांना बाहेर काढल्यानंतर त्यांना पुन्हा उकळत्या तेलात टाका आणि सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळा.

वरील स्टेप्सनुसार तुमचे फ्राईज क्रिप्सी आणि क्रंची होतील. तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेव्हरप्रमाणेही त्यात काही पदार्थ टाकू शकता.

हेही वाचा दुर्मीळ, चविष्ट आणि हेल्दी पावसाळी रानभाज्या

सॉल्टी फ्राईज

साधारण फ्राईज बनवून झाल्यावर त्यावर मिठ टाकले जाते. तुम्ही तुमच्या चवीनुसार यावर मिठ टाकू शकता. तसेच, केचअपसोबतही तुम्ही फ्राईज खाऊ शकता.

चिझी फ्राईज

फ्राईजमध्ये सर्वाधिक आवडता फ्लेव्हर म्हणजे चिझी फ्राईज. काही ठिकाणी मेल्ट चिझ आणि मेयॉनिजमध्ये फ्राईज दिले जातात. तर काही ठिकाणी फ्राईजवर चीझ कुस्करून टाकले जातात.

स्पायसी फ्राईज

स्पायसी फ्राईजसाठी ऑलिव्ह ऑईल, स्मोक पप्रिका, गार्लिक पावडर, ओल्ड बे, ब्लॅक पेपर टाकून तुम्ही स्पायसी फ्राईज बनवू शकतात.

हेही वाचा – पावसाळ्यात मका खाणे आहे आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे