घरताज्या घडामोडीReverse Walking : सरळ चालून कंटाळा आलाय ? तर उलटे चालून बघा,...

Reverse Walking : सरळ चालून कंटाळा आलाय ? तर उलटे चालून बघा, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Subscribe

 १००० सरळ पावलं चालण्यापेक्षा १०० उलट गतीने चालल्याने जास्त फायदा होतो. उलट गतीने  वॅाक केल्याने  हृदय, मेंदू आणि शरीरात रक्तवाहिन्यांना रक्ताचा आणि ऑक्सीजनचा जास्त पुरवठा होतो.

 Reverse Walking :  आजकल धावपळीच्या जगात कामाबरोबरचं अनेक मंडळी फिटनेसकडे दुर्लक्ष करू लागली आहेत. नियमीत व्यायाम न करणे, सतत एका जागी बसून काम  करणे यामुळे लोकांमध्ये अनेक शारिरीक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आता अलीकडील तरूण पिढी फिटनेसला जास्त महत्व देताना दिसून येते. अनेक जण आपल्या ठरावीकवेळे नुसार सकाळी किंवा संध्याकाळी वॅाकला जातात. परंतु तुम्ही कधी उलट गतीने चालून वॅाक केलेलं कधी ऐकलय का? नाही ना, पण हो हे खरं आहे. खरंतर उलट गतीने चालून वॅाक केल्याने अनेक फायदेशीर परिणाम दिसून येतात. अनेक शारिरीक समस्यांपासून सुटका होते. हृदय, डोकं आणि मेटाबॉलिज्मसाठी फायदेशीर ठरते. सामान्य पध्दतीने चालण्याच्या तुलनेत उलट गताने चालल्याने जास्त प्रमाणात कॅलरीज कमी होतात.

 

- Advertisement -

फिटनेस  एक्सपर्ट सांगतात की,  १००० सरळ पावलं चालण्यापेक्षा १०० उलट गतीने चालल्याने जास्त फायदा होतो. उलट गतीने  वॅाक केल्याने  हृदय, मेंदू आणि शरीरात रक्तवाहिन्यांना रक्ताचा आणि ऑक्सीजनचा जास्त पुरवठा होतो.

आर्थराइटीससाठी फायदेशीर

- Advertisement -

उलट गतीने चालल्याने गूडघ्यातील आर्थराइटिसचचे लक्षण कमी होतात. शरीराचा समतोल राखला जातो. उलटे चालल्याने चालण्यात गतिशीलता येते.

हृदयविकारापासून सुटका

फिटनेस  एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही प्रकारे चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. फक्त हृदयच नाही तर फुफ्फुसांना देखील याचा फायदा होतो. नियमित चालल्याने ब्लड प्रेशर संतुलित राहते. त्याबरोबरच ब्लड शुगर सुद्धा नियंत्रीत राहते. त्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते.

OSA ज्या आजाराने बप्पी लहरींचे निधन झाले, नेमका काय आहे ‘ओएसए’ आजार

फिटनेस  एक्सपर्ट सांगतात, उलट गतीने चालल्याने संपूर्ण शरिराला त्याचा फायदा होतो. हाडे मजबूत होतात, प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नव्हे तर डोळ्यांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे. यामुळे मानसिक आरोग्य नीट राहते.


हेही वाचा – Vastu Tips For Plant : आर्थिक नुकसान करणारी झाडे तुमच्या घरात आहेत का ? लगेच काढा, अन्यथा बसेल मोठा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -