Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthमधुमेहाचा धोका वाढवतील तुमच्या 'या' सवयी

मधुमेहाचा धोका वाढवतील तुमच्या ‘या’ सवयी

Subscribe

जगभरात मधुमेहाचा आजार वेगाने वाढत आहे. वयस्कर लोकासंह तरुणांमध्ये सुद्धा मधुमेहाचा आजार होतोय. खरंतर मधुमेह हा असा आजार आहे जो लगेच बरा होत नाही. मात्र तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करुन याचा धोका कमी करु शकता. हेल्थ एक्सपर्ट्स मधुमेहाच्या रुग्णांना वेळोवेळी ब्लड शुगर तपासण्याचा सल्ला देतात.

मधुमेहासाठी तणावाव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे हा आजार ट्रिगर होऊ शकतो. जेनेटिक्स सुद्धा मधुमेहाच्या आजारासाठी महत्त्वाची भुमिका बजावतात. मधुमेह असलेल्या पालकांच्या मुलांना सुद्धआ 50 टक्क्यांपेक्षा अधिक हा आजार होण्याची शक्यता असते. अशातच तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे मधुमेह ट्रिगर होऊ शकतो याच बद्दल पाहूयात.

- Advertisement -

-डाएट व्यवस्थितीत नसणे

The Vegetarian Diet: A Beginner's Guide and Meal Plan
जर तुम्ही तुमच्या डाएटकडे लक्ष दिले नाही तर मधुमेहाचा धोका वाढू शकतो. जंक फूड, रिफाइंड कार्ब्स आणि शुगरयुक्त फूड्स खाल्ल्याने सुद्धा मधुमेहाचा धोका वाढू शकतो. दररोज तुम्ही असे फूड्स खाल्ल्याने सुद्धा मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

- Advertisement -

-खुप वेळ बसून राहणे

Does Sitting Kill Your Back?. Lessons learned from animals on how to… | by  Alex | In Fitness And In Health | Medium
दीर्घकाळ बसून राहिल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. चुकीची खाण्यापिण्याची सवय, झोप आणि तणावामुळे आपल्या शरिरात स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल आणि वॅसोप्रेसिनचा स्तर वाढू शकतो. ही सर्व मधुमेहाची कारणं आहेत. त्यामुळे आपल्या लाइफस्टाइलमध्ये व्यायामाला सुद्धा महत्त्व द्यावे.

-रिफाइंड कार्ब्स

Refined Carbohydrates – NIH Director's Blog
मेदा आणि रिफाइंड शुगर सारख्या फूड्समुळे मधुमेहाचा धोका वाढतो. रिफाइंड शुगर आणि मैद्यात कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे ते आपल्या रक्त प्रवाहात वेगाने शोषले जातात. यामुळे इंसुलिनचा स्तर बिघडला जातो.

-स्मोकिंग

Smoking | Psychology Today
सिगरेट, हुक्का आणि वॅप सारख्या स्मोकिंग गोष्टींमध्ये सुद्धा धोकादायक केमिकल्स असतात. ते आपल्या शरिरावर वाईट परिणाम करतात आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

-तणाव

Hindi - 8 best stress busters for college students | College
जर तुमच्या आयुष्यात अधिक तणाव असेल तर मधुमेह होण्याची शक्यता असते. स्ट्रेस ब्लड शुगरचा स्तर बिघडवतो आणि मधुमेहाचा धोका ही यामुळे वाढला जातो.


हेही वाचा- ‘या’ कारणांमुळे सतत बसून राहिल्याने होते Hip Pain

- Advertisment -

Manini