घरलाईफस्टाईलकेसगळतीवर अत्यंत गुणकारी 5 प्रकारचे तेल

केसगळतीवर अत्यंत गुणकारी 5 प्रकारचे तेल

Subscribe

केसांची उत्तम वाढ होण्यासाठी केसांना तेल लावणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते.

मुलायम केस असावेत असे प्रत्येक महिलेला किंवा मुलीला वाटत असते. पण हल्लीची बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे अनेकांना केसगळती किंवा लहान वयात केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. खरंतर केसांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून पोषण मिळते. त्याचप्रमाणे केसांची उत्तम वाढ होण्यासाठी केसांना तेल लावणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते. आज आपण पाच तेलांचे प्रकार पाहणारा आहोत जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. ज्याच्या वापराने केसगळतीची समस्या दूर होऊन केसांची उत्तम वाढ होईल.

1) बदाम तेल

- Advertisement -

बदाम तेल निरोगी, कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड इत्यादींनी युक्त बदाम तेल केसांसाठी पोषक असते. हे केसांना पोषण देऊन मजबूत करते तसेच केसांची चमक वाढवते. केमिकल बेस्ड हेअर कलर आणि लोशनचा वारंवार वापर केल्याने केस खराब होतात. अशा केसांना बदामाचे तेल लावल्याने त्यांची चमक पुन्हा वाढू शकते. बदामाच्या तेलामध्ये लिनोलिक अॅसिड असते, जे केसांना पोषण आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. कोरड्या झालेल्या केसांना शॅम्पूने धुण्यापूर्वी रात्री कोमट बदामाचे तेल लावा.

2) नारळाचे तेल

- Advertisement -

बहुतेक लोक केसांना नारळाचे तेल लावतात. हे तेल केसांना मऊ, निरोगी आणि चमकदार बनवते, म्हणून ते केसांसाठी उत्तम असते. नारळाचे तेल केसांना लावून हलक्या हाताने मसाज केल्याने केसांच्या मुळांपासून रक्ताभिसरण वाढते आणि केस मऊ होतात. हे तेल लावल्या नंतर केसांना रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी माईल्ड शैम्पूने केस धुवा. केसांना आठवड्यातून दोनदा कोमट नारळाचे तेल लावा. त्यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून पाणी पिळून गरम टॉवेल डोक्याभोवती पगडीसारखा गुंडाळा. 5 मिनिटे तसेच राहू द्या. गरम टॉवेल गुंडाळण्याची ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा पुन्हा करा. यामुळे केस आणि टाळू तेल चांगल्या प्रकारे शोषून घेतात.

hair-oil

3) तीळाचे तेल

तिळाचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर असते कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. हे तेल लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. त्याचप्रमाणे केसांची वाढ होते आणि केस गळणेही थांबते. रंगीत केसांना गरम केलेले तिळाचे तेल लावल्याने त्यांची हरवलेली चमक परत येते. हे केसांचे पोषण करते आणि त्यांना मऊ बनवते. हे फाटणे टाळते आणि केसांना चमक आणते.

4) भृंगराज तेल

भृंगराज ही आयुर्वेदाने मान्यता दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. केस वाढवण्यासोबतच त्यांना मुळांपासून मजबूत करते. तीळ, नारळ, आवळा, ब्राह्मी इत्यादी कोणत्याही तेलात भृंगराज तेल मिसळून लावल्यास अधिक फायदा होतो.

5) जोजोबा तेल

केसांमध्ये कोंडा होत असेल आणि केस वेगाने गळत असतील तर जोजोबा तेल लावा. हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होतो, अशा परिस्थितीत जोजोबा तेल लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. हे तेल टाळूवर लावल्यानेही फायदा होतो. हे तेल लावून हलक्या हातांनी मसाज करावा आणि तासाभराने केस धुवावेत.


हे ही वाचा – ‘या’ 6 भाज्या आहेत व्हिटॅमिन सी चा खजिना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -