Sunday, June 11, 2023
घर मानिनी Relationship 77 वर्षीय आजीचा अनोखा विवाह

77 वर्षीय आजीचा अनोखा विवाह

Subscribe

सध्या जग वेगाने बदलत चालले आहे. त्यामुळे लाइफस्टाइल ही बदलली जातेय. अशातच लग्नसुद्धा अनोख्या आणि हटके पद्धतीने करण्याचा ट्रेंन्ड सुरु झाला आहे. लग्नाची व्याख्या ही बदलली गेली आहे. लोक स्वत: शीच किंवा आपल्या आवडत्या पाळीव प्राण्यासोबत ही लग्न करतयात. ही कॉन्सेप्ट थोडी विचित्र आहे. पण असं खरंच घडतयं. असेच काहीसे एका अमेरिकन आजीने केले आहे.

77 वर्षीय डोरोथी डॉटी फिडेली असे तिचे नाव आहे. तिने अगदी सुंदर पद्धतीने लग्न केले. पण यावेळी मात्र नवरदेव नव्हते. खरंतर आजीने स्वत: शीच लग्न केलेयं. तिच्या वेडिंगचे फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, डोरोथी नावाच्या महिलेने वयाच्या 77 व्या वर्षी लग्न केले आहे. आता तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायची इच्छा नाही. डोरोथीने आपल्या लग्नासाठी प्रत्येक गोष्टींसाठीचा प्लॅन स्वत: केला होता. सजावट, जेवण आणि अन्य गोष्टी सुद्धा तिनेच ठरवल्या. पण मुलीने तिच्यासाठी वेडिंग ड्रेस आणि फुलांची व्यवस्था केली. अशा प्रकारे ३ मुलांची आई असलेल्या डोरोथीने आता स्वत: शीच लग्न केलेयं.

- Advertisement -

यापूर्वी केलं होतं लग्न
ओहियोचे O’Bannon Terrace Retirement Home मध्ये तिचे लग्न झाले होते. त्यावेळी सर्वजण खुप खुश होते. तिने पहिल्यांदा १९६५ मध्ये लग्न केले जे ९ वर्षानंतर मात्र मोडले.


हेही वाचा- Mother’s Day Special: बॉलीवूडच्या ‘या ‘अभिनेत्रींची सासूबरोबर आहे जबरदस्त बॉन्डिंग

- Advertisment -

Manini