घरताज्या घडामोडीआहार भान: चिबुडाचे पायसम (खीर)

आहार भान: चिबुडाचे पायसम (खीर)

Subscribe

'आहार भान ' या सदरात मी रुग्णांसाठी पथ्यकर, आरोयदायी तरीही रुचकर अशा पाककृती सादर करणार आहे. या पदार्थाचे आधुनिक शास्त्रनुसार महत्त्व, आयुर्वेद नुसार माहिती आणि रुग्णांच्या कुठल्या समस्येवर त्याचा उपयोग होतो. हे तुम्हाला सांगणार आहे. अगदी कॅन्सरपासून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा आहार नक्की फायदेशीर आहे.

‘आहार भान’ या ब्लॉगची सुरुवात आपण गोड पदार्थाने करुया. गोड पदार्थ सगळ्यांना आवडतात खरे पण तेलात/तुपात तळलेले, साखरेच्या पाकात घोळवलेले पदार्थ खाताना मनात धाकधूक पण असते. न जाणो किती जंक कॅलरी पोटात जातील म्हणून. मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट्स ही त्रयी गोड पदार्थाना खलनायक बनवते. आपल्या ‘आहार भान’ ब्लॉगमध्ये आज आपण चिबुडाची खीर कशी बनवतात ते आपण पाहणार आहोत.

चिबूड हे खरबूज, टरबूज यांच्या कुळातील फळ. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर श्रावण ते दिवाळी या काळात मिळते. मधूर, रसाळ पोटभरे. सणासुदीला याचा मान मोठा. गणपतीच्या प्रसादात हवेच हवे. नवरात्रीचे उपवास करणाऱ्याला चिबूडचा मोठा आधार. थोडे खाल्ले तरी पोट भरणार, जीवाला शांत करणार. किती तरी विविध तऱ्हेने याचे सेवन करता येते. ज्युस/स्मूदि, मिल्कशेक बनवा किंवा फोडींवर थोडे मीठ, साखर, काळीमिरी भुरभुरून खा. गोव्यात, कारवारकडे दिवाळीत चिबूडाच्या पायसममध्ये पोहे टाकून खातात.

- Advertisement -

चिबूड, नारळ, गूळ असे सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरून हे पायसम बनवले जाते. कोंड्याचा मांडा करणाऱ्या एखाद्या चतुर गृहिणीने हा पदार्थ शोधला असणार. सणासुदीला सगळ्यांच्या घरी गोडधोड बनायला हवे.

साहित्य

- Advertisement -
  • चिबूडाच्या मध्यम आकाराच्या फोडी – १ कप
  • ओल्या नारळाची पेस्ट – १ कप
  • गूळ – अर्धा कप
  • वेलची पूड – १ ते २ चमचे

कृती

१. चिबूड धुवून त्याची साल काढा. मध्यम आकाराचे तुकडे करा.
२. एक कप खिसलेले ओले खोबरे घ्या. मिक्सरमध्ये ते बारीक वाटून घ्या.
३. एक स्टीलचे भांडे मंद आचेवर ठेवा. त्यात वाटलेले खोबरे घाला. अर्धा कप पाणी घाला आणि मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजवा.
४. अर्धा कप गूळ घाला. गूळ विरघळल्यावर त्यात २ चमचे वेलची पूड घाला.
५. यात चिबूडाचे तुकडे घालून २ मिनिटे ढवळा.
६. गरम गरम ही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता.

डॉ. ऋजुता कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -