घरताज्या घडामोडीआहार भान - भेजा फ्राय

आहार भान – भेजा फ्राय

Subscribe

नुसत्या आठवणीनेही जिभेला चाळवणारा पदार्थ म्हणजे भेजा फ्राय. मऊ, लुसलुशीत. बटरमध्ये तळलेल्या पावा बरोबर खाताना ब्रह्मानंदी टाळी लागते. आजारी पडल्यावर किंवा खूप मोठी जखम झाली तर शक्ती भरून येण्यासाठी भेजा फ्राय जरूर खावा असे माझी आजी सांगत असे. आधुनिक शास्त्रानुसार, बकऱ्यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि लोह असते. कर्बोदके कमी प्रमाणात असतात. शरीराला उपयुक्त असणारी ओमेगा थ्री फॅटी अँसिड्स असतात. पण कोलेस्टेरॉल भरपूर असते म्हणून कधीतरी खावे आणि कमी प्रमाणात खावे.असाही मेंदू खूप महाग असतो आणि छोटाही असतो. त्यामुळे घरी बनवला तर कमीच खायला मिळणार.

साहित्य

- Advertisement -
  • बकऱ्याचा मेंदू एक नग
  • साजूक तूप – २ चमचे
  • आले लसूण कोथिंबीर पेस्ट – १ छोटा चमचा
  • हळद पाव चमचा
  • काळीमिरी पावडर (ऑप्शनल) – पाव चमचा

कृती –

  1. मेंदू स्वच्छ धुवून घ्या.
  2. त्याचे ४-५ छोटे तुकडे करा.
  3. एक कढई मंद आचेवर ठेवा.
  4. 2 चमचे साजूक तूप घाला.
  5. तूप वितळल्यावर त्यात १ चमचा आले लसूण कोथिंबीर पेस्ट घाला. अलगद परतून घ्या.
  6. पाव चमचा हळद घाला. मेंदूचे तुकडे घाला. चवीनुसार मीठ घालून अलगद परतून घ्या.
  7. कढईवर झाकण ठेवून त्यात थोडे पाणी घाला. मंद आचेवर ५ मिनिटे ठेवा.
  8. झाकण काढून मेंदूचे तुकडे परतावा.
  9. अगदीच सुके झाले असेल तर थोडेसे पाणी शिंपडावे.
  10. मिनिटे शिजवा.

गरम गरम भाकरी बरोबर किंवा बटर मध्ये तळलेल्या पावा बरोबर खावे.

- Advertisement -

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -