घरताज्या घडामोडीआहार भान - चिकन सूप

आहार भान – चिकन सूप

Subscribe

सूप हा शरीराला पोषण देणारा, भूक वाढवणारा, पचायला हलका असा पौष्टिक पदार्थ आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ऐंशी वर्षांच्या आजोबा आजीलाही बळ देणारा, जिभेची रुची वाढवणारा पदार्थ आहे. आजारपणातही खूप थकवा आलेला असतो किंवा नेहमीच घन आहार पचत नसतो तेव्हा वेगवेगळे सूप जरूर करावेतआज आपण करूया चिकन सूप. अगदी सोप्पे आहे.

साहित्य – 

  • चिकनचे  ८-१० छोटे छोटे तुकडे
  • साजूक तूप दोन छोटे चमचे
  • हळद पाव चमचा
  • आले लसूण पेस्ट अर्धा चमचा
  • काळीमिरी – २
  • लवंग – २
  • दालचिनी छोटा तुकडा
  • चक्रीफुल – १
  • मीठ चवीनुसार

कृती  – 

१. चिकन आणले की त्यातील हाडे, कलेजी, तिठा, डोके, मानेचा भाग बाजूला काढायचा. त्यांचे छोटे तुकडे करायचे. २-३ वेळा धुवून घ्यायचे.

- Advertisement -

२.  थोडे हळद मीठ लावून १०-१५ मिनिटे ठेवायचे.

३. एका पातेल्यात दोन चमचे साजूक तूप घ्यायचे.

- Advertisement -

४. तूप गरम झाले की त्यात अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, चिमूट भर हिंग, दोन चिमूट हळद, २ काळीमिरी, २ लवंग, दालचिनीचा छोटा तुकडा टाकून थोडे परतायचे.

५. लगेच त्यात चिकनचे तुकडे घालून १ मिनिट परतायचे.

६. दोन अडीच कप पाणी घालून मध्यम आचेवर उकळवायचे.

७. ८-१० मिनिटे चांगले उकळावे पण फार आटू देऊ नये.

९. चवीनुसार मीठ घालून गरम गरम सर्व्ह करावे.

रविवारी चिकन आणले की काही तुकडे बाजूला काढून असा सूप नेहमी बनवा.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]


हेही वाचा – आहार भान – पौष्टिक चटपटीत केक; हांडवा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -