घरताज्या घडामोडीआहार भान - पौष्टिक चटपटीत केक; हांडवा

आहार भान – पौष्टिक चटपटीत केक; हांडवा

Subscribe

केक म्हटला की घरी बनवलेला साधा स्पंज केक ते वाढदिवसासाठी आणलेला छान आयसिंग केलेला केक डोळ्या समोर येतात. आज आपण तिखट, चटपटीत भरपूर भाज्या घातलेला देसी केक बनवणार आहोत. हांडवा हा गुजराती पदार्थ आहे. तसे वर्षभर बनवू शकता पण थंडीत संध्याकाळी चहा बरोबर गरम गरम हांडवा खाण्याची मजा काही औरच असते. हांडवा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. सगळ्या डाळी, मोसमातील रसरशीत भाज्या त्यात असतात. बच्चे कंपनी तर अगदी आवडीने खाते.

साहित्य – 

- Advertisement -
  • तांदूळ , मूग डाळ, मसूर डाळ प्रत्येकी एक छोटी वाटी.
  • उडीद डाळ – १ मूठ
  • दही – २ मोठे चमचे
  • गाजर, फरसबी, फ्लॉवर यांचे छोटे तुकडे –  २ वाट्या
  • वाफवलेले मटार – १ वाटी
  • बारीक कापलेली कोथिंबीर – १ वाटी
  • कांद्याची पात – १ वाटी
  • बारीक चिरलेला कडीपत्ता – २ मोठे चमचे
  • हळद पाव चमचा
  • धने जिरे पावडर – २ चमचे
  • लाल तिखट चवीनुसार
  • मीठ चवीनुसार
  • ओवा – २ चिमूट

कृती –

१. तांदूळ आणि सगळ्या डाळी २-३ वेळा धुऊन पाण्यात भिजत घाला.

- Advertisement -

२. तीन तासांनी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

३. त्यात दोन चमचे दही, भाज्या, मसाले , मीठ, ओवा घालून मिक्स करा. भाज्यांच्या पिठापेक्षा दाट, सरबरीत पीठ असायला हवे.

४. दोन तास हे मिश्रण तसेच राहू द्या.

५. एका फ्राय पॅनमध्ये थोडे तेल घ्या. त्यात वरील मिश्रण घाला. केक करताना आपण घालतो तसे हे मिश्रण घालायचे.

६. वर झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.

७. खरपूस वास यायला लागला की हांडवा उलटवायचा. बाजूने थोडे तेल सोडायचे.

८. ५-७ मिनिटांनी सुरी ने शिजला आहे का ते पाहा.

९. दोन्ही बाजूने खरपूस झाल्यावर वरून राई, तीळ, कडीपत्ता यांची फोडणी घालायची.

१०. टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी बरोबर फार छान लागतो.

डॉ . ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -