घरताज्या घडामोडीआहार भान - मिक्स व्हेज सूप

आहार भान – मिक्स व्हेज सूप

Subscribe

हिवाळ्यात ताज्या, रसदार भाज्यांनी मंडई भरून वाहते. वेगवेगळे पदार्थातून या भाज्या पोटात जायला हव्यात. आबाल वृध्द, आजारी, निरोगी या सगळ्यांना चालेल असा पदार्थ म्हणजे सूप. गेल्या शनिवारी आपण चिकन सूप कसे बनवायचे ते पाहिले. आज आपण बनवूया थिक मिक्स व्हेज सूपलाल गाजर, हिरवी ब्रोकोली, पांढरा दुधी किंवा कोहळा, लालचुटुक टोमॅटो यांचा आपण एकत्रित सूप बनवूया. म्हणजे सगळ्यांचे एकत्रित फायदे आपल्याला मिळतील.

ब्रोकोली ही कोबी फ्लॉवर यांच्या कुळातील परदेशी भाजी आहे. पण आता आपल्याकडेही सर्रास मिळते. यात फायबर खूप असते. व्हिटॅमिन ए, बी, सी, ई भरपूर प्रमाणात असतात. ब्रोकोलीचे सेवन कॅन्सरला प्रतिबंध करू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

साहित्य 

  • ब्रोकोली चे देठा सह तुरे – २ वाट्या
  • गाजराचे तुकडे – २ वाट्या
  • दुधीचे तुकडे – १ वाटी
  • मध्यम आकाराचे एक टोमॅटो
  • आले लसूण पेस्ट अर्धा चमचा
  • काळीमिरी -. २-३
  • दालचिनी एक छोटा तुकडा
  • लवंग – २-३
  • साखर – १ छोटा चमचा
  • बटर – २ छोटे चमचे
  • मीठ चवीनुसार

कृती 

- Advertisement -

१. ब्रोकोली, गाजर, दुधी धुवून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

२. वरील भाज्या आणि टोमॅटो प्रेशर कुकरमध्ये २ शिट्या घेवून शिजवून घ्या.

३. शिजलेल्या टोमॅटोची साल काढून टाका.

४. सर्व भाज्या गार झाल्यावर मिक्सर मधून काढा.

५ . एका पातेल्यात २ छोटे चमचे बटर घ्या. ते वितळल्यावर त्यात अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, काळीमिरी, दालचिनी आणि लवंग टाका. थोडे परतून घ्या.

६. यात मिक्सर मधून काढलेला भाज्यांचा गर घाला. एक वाटी पाणी घाला.

७. चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा साखर घाला. चांगले मिक्स करून घ्या.

८. ५-७ मिनिटे मध्यम आचेवर चांगले उकळू द्या.

९. गरम गरम सर्व्ह करा.

संध्याकाळी थंड वारे सुटलेले असताना, ऑफिस मधून दमून भागून आल्यावर एक बाऊल भरून हा थिक सूप घेतला म्हणजे २ तासांची निश्चिंती.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -