घरताज्या घडामोडीआहार भान - व्हेज पास्ता

आहार भान – व्हेज पास्ता

Subscribe

पास्ता, पिझ्झा, बर्गर हे मुलांचे आवडते पदार्थ. जंकफूड आहे म्हणून आपण मुलांना रागे भरतो पण मोठ्यांनाही आवडतात की हे पदार्थ. पास्ता मैद्याचा असतो म्हणून चांगला नाही. पण आजकाल गव्हाच्या पिठाचा ही पास्ता मिळतो. त्यात खूप भाज्या घालून, घरी व्हाईट सॉस बनवून आपण हेल्दी व्हेज पास्ता बनवूया.

साहित्य 

- Advertisement -
  • होल व्हीट पास्ता – २ कप
  • मैदा – २ मोठे चमचे
  • ब्रोकोली – २ कप
  • वाफवलेले मक्याचे दाणे – १ कप
  • लाल पिवळ्या सिमला मिरचीचे तुकडे – १ कप
  • टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी –  दीड कप
  • वाफावले ले मटार – अर्धा कप
  • पिझ्झा मिक्स हर्ब्ज
  • दूध – १ वाटी
  • चीज आवडीनुसार
  • बटर – ३-४ चमचे

कृती 

१. सगळ्या भाज्या धुवून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

- Advertisement -

२. मक्याचे दाणे आणि मटार वाफवून घ्या.

३. एका कढईत १ चमचा बटर टाकून ब्रोकोली आणि सिमला मिरचीचे तुकडे फक्त परतून घ्या. त्यावर थोडे मीठ टाकून एका ताटात काढून ठेवा.

४. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा बटर टाका. एक छोटा चमचा मीठ घाला. पाणी गरम झाले की पास्ता घाला. पास्ता बुडून वर राहील इतके पाणी घालावे. शिजायला लागला की पास्ता खूप फुलतो तेव्हा पाणी भरपूर घालावे. मध्यम आचेवर पास्ता शिजवावा. अधून मधून ढवळावा नाहीतर खाली लागतो.

५. पास्ता पूर्ण शिजला का हे चमच्याने बघावे. पास्ता शिजल्यावर एका मोठ्या चाळणीत ओतून घ्यावा म्हणजे पाणी सगळे निघून जाईल. थोडा चमच्याने खाली वर करावा म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही.

६. कढईत २ चमचे बटर घ्या. त्यात २ मोठे चमचे मैदा टाका. चमच्याने हलवून मैदा चांगला भाजून घ्या. किंचित गुलाबी रंग आला की त्यात थोडे थोडे दूध टाकून हलवत रहा. मैद्याच्या गुठळ्या होऊ द्यायचा नाहीत.

७. साधारण पणे 2 कप पाणी घालून मंद आचेवर चांगला दाट सॉस होऊ द्या.

८. या सॉसमध्ये किसलेले चीज घाला. चीज विरघळेपर्यंत ढवळत रहा. सॉस पुरता मीठ घाला. पास्ता घालून चांगले मिक्स करा.

९. आता यात ब्रोकोली आणि लाल पिवळी सिमला मिरचीचे तुकडे, वाफव लेले मक्याचे दाणे, मटार आणि टोमॅटो घाला.

१०. यावर १-२ छोटे चमचे पिझ्झाचे मिक्स हर्ब्ज घाला. आवडत असल्यास किंचित काळीमिरी पूड आणि रेड चीली फ्लेक्स पण घालू शकता. गरज असल्यास मीठ घाला.

११. चांगले मिक्स करा आणि पाच मिनिटे मंद आचेवर राहू द्या. ब्रोकोली, रंगीत मिरची पूर्ण शिजू द्यायची नाही. अशी अर्धी कच्चीच छान लागते.

गरम गरम सूप, व्हेज पास्ता आणि गार्लिक ब्रेड असा वेगळा मेनू तुम्ही ख्रिसमस साठी बनवून बघा. घरातील लहान थोर सगळे खुश होतील.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -