घरताज्या घडामोडीआहार भान: मुगाची सात्विक भाजी

आहार भान: मुगाची सात्विक भाजी

Subscribe

'आहार भान' या सदरात दर शनिवारी रुग्णांसाठी पथ्यकर, आरोग्यदायी आणि तरीही रुचकर अशा पाककृती घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. या पदार्थाचे आधुनिक शास्त्रनुसार महत्त्व, आयुर्वेदनुसार माहिती आणि रुग्णांच्या कुठल्या समस्येवर त्याचा उपयोग होतो. हे तुम्हाला सांगणार आहे. अगदी कॅन्सरपासून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा आहार नक्की फायदेशीर आहे.

कॅन्सरवरचे उपचार चालू असताना विशेषतः केमो चालून असताना खूप थकवा येतो. अगदी गळून गेल्या सारखे होते. तो थकवा भरून काढण्यासाठी डॉक्टर हाय प्रोट्रीन डायेट घ्यायला सांगतात म्हणजेच जेवणात जास्त प्रथिने घ्यायला सांगतात. शाकाहारी जेवणात प्रथिनांचा पुरवठा डाळी आणि कडधान्ये यांनी होतो. पण छोले, काळे वाटाणे, पावटे, वाटाणे इत्यादींमुळे साध्या माणसालाही गॅसेस होणे, पोट डब्ब होणे असे त्रास होऊ शकतात. मग केमो चालू असणाऱ्या रुग्णाची पचन शक्ती कमी झालेली असते तेव्हा त्याला ही कडधान्ये पचत नाहीत.

त्यामानाने मूग मसूर ही कडधान्ये पचायला हलकी असतात. मुगला तर आयुर्वेदाने ‘अग्नी दिपक’ म्हणजे जठराग्नी चेतवणारा असे गौरविले आहे. जैन धर्मीय पण दीर्घाकाळ उपवास करतात तेव्हा मुगाचे कढण घेवून उपवास सोडतात. लाल तांदळाची पेज, मुगाचे कढण आणि तांदूळ मूग डाळीची खिचडी हा रुग्णांसाठी आदर्श आहार आहे. आज आपण करणार आहोत मुगाची सात्विक, उपवासाची भाजी.

- Advertisement -

साहित्य

  • भिजवून मोड आलेले मूग – १ वाटी
  • ओले खोबरे – २ ते ३ चमचे
  • जिरे – १ चमा
  • हिंग
  • कडीपत्ता
  • साजूक तूप – २ चमचे

कृती

- Advertisement -

१. भाजीच्या छोट्या कुकरमध्ये २ चमचे साजूक तूप घाला.
२. तूप चांगले गरम झाले म्हणजे त्यात १ चमचा जिरे टाका. जिरे चांगले परतून घ्या. त्याचा घमघमाट सुटला पाहिजे.
३. छोटा पाव चमचा हिंग आणि भरपूर कडीपत्ता घाला. चांगले परतून घ्या.
४. मोड आलेले मूग ३ वेळा फिल्टरचे पाण्याने धुवून घ्या. ते कुकर मध्ये घाला. ओले खोबरे, चवीनुसार मीठ घाला. चांगले मिक्स करा.
५. मूग बुडतील इतपत फिल्टरचे पाणी घाला.
६. कुकरचे झाकण लावून ३ शिट्या घ्या.
७. तयार झाली तुमची मुगाची सात्विक भाजी.

ही भाजी शिजत असताना साजूक तुपाचा आणि जिऱ्याचा दरवळ घरभर सुटतो त्यानेच भूक प्रदीप्त होते.

डॉ. ऋजुता कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -