Chanakya Niti : ‘या’ मार्गाने आलेला पैसा नेहमी व्यक्तीला कंगाल करतो; कारण..?

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात या गोष्टींचा वापर केल्यास आयुष्यातील अनेक संकटांवर मात होऊ शकते.

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात धनवान होण्याची अपार इच्छा असते. यासाठी लोक खूप मेहनत देखील करताता. तर काहीजण चूकीच्या मार्गाने पैसा कमावून लवकर श्रीमंत होतात. चाणक्य नीतीनुसार अफाट धन-संपत्तीचे मालक व्हायचे असेल तर खूप मेहनतीबरोबरच, बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचे कर्म सुद्धा चांगले असायला हवे. जेव्हा व्यक्तीचे कर्म चांगले असतात तेव्हा त्याव्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होते. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसा कमावते तेव्हा अशा व्यक्तीवर देवी लक्ष्मी नाराज होतात.

चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा लवकर नष्ट होतो

  • चाणक्य नीतीनुसार, चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा म्हणजेच चोरी करणे, खोट बोलून लुबाडणे, पैश्यांसाठी हत्या करणे, चुकीचे काम करुन पैसा कमावणे यांसारख्या चुकीच्या मार्गाने पैसा कमावल्यास तो पैसा कधीही फार काळ टिकत नाही.
  • चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा देवी लक्ष्मीला देखील अप्रिय असतो. अश्या पैश्यांमुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे चाणक्यांच्या मते, भले पैसा थोडा कमावला तरी चालेल पण तो चांगल्या मार्गाने मेहनत करुन कमावायला हवा.

दान-धर्म देखील आवश्यक
चाणक्यांच्या मते, देवी लक्ष्मी अशा लोकांवर प्रसन्न असतात जे आपल्या कमाईतील काही पैसे गरजू लोकांना दान करतात.

 


हेही वाचा :

Vastu Tips : स्वयंपाकघराशी संबंधित पाळा ‘हे’ महत्त्वाचे नियम; देवी अन्नपूर्णा होतील प्रसन्न