घरलाईफस्टाईल'या' Fiber Foods चा वापर करून तुमचं डाएट बनवा हेल्दी!

‘या’ Fiber Foods चा वापर करून तुमचं डाएट बनवा हेल्दी!

Subscribe

फास्ट लाईफ स्टाईल जगत असताना कित्येकदा घरचं पौष्टिक जेवण खाण्यास तितकासा निवांत वेळ काहींना मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ते फास्ट फूडचा पर्याय निवडतात. यासह दररोजच्या आहारात आपण नवनवीन पदार्थ तयार करून खात असतो. मात्र आपण जे रोज खातो ते आपल्या शरीरास कितपत योग्य किंवा पौष्टीक आहे. कमी वेळात उपलब्ध होणारे फास्टफूड अर्थात जंकफूड खाण्यामध्ये ती पोषक घटक नसतात ती आपल्याला आपल्या घरच्या जेवणातून मिळतात. यामुळे कित्येक आजारांचा सामना करावा लागतो. आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक पोषक घटक म्हणजेच फायबर युक्त घटकांचा समावेश आपल्या रोजच्या आहारातून व्हायला हवा. सॉल्युबल फायबर आणि दूसरं इनसॉल्युबल फायबर हे दोन्ही घटक हेल्दी डाएटमधून आपल्याला मिळतात.

फायबरयुक्त घटक पचनक्रिया मजबूत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यास, आपण फायबर युक्त आहार घेणं आवश्यक आहे. याशिवाय वजन कमी करणे, चमकणारी त्वचा मिळविणे आणि बोवेल सिंड्रोमपासून सुटका होण्यासाठी फायबर देखील खूप महत्वाचे आहे. आहारात फायबरयुक्त असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश केल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवत नाहीत. म्हणून, दैनंदिन आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

- Advertisement -
  • फायबरयुक्त डाएटमध्ये तुम्ही आहारात कॉर्न, मक्का खायला हवा. यामध्ये सुमारे ४ टक्के फायबर असते.
  • डाळी, रजमा आणि छोले यासारख्या गोष्टींचा समावेश आहारात केला पाहिजे. हा फायबरचा चांगला स्रोत आहे. कोंब फुटलेल्या कडधान्यातून जास्त फायबर मिळण्यास मदत होते.
  • सर्व फळांमध्ये फायबर हा घटक असतो. मात्र पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याशिवाय सफरचंद आणि नासपती देखील फायबरयुक्त असतात.
  • आहारात तंतुमय भाज्या समाविष्ट असल्या पाहिजेत. अशा भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. गाजर आणि पालेभाज्यांमधून जास्तीत जास्त फायबर मिळते
  • गव्हापासून बनवलेल्या ब्राऊन ब्रेडमध्ये फायबरचा चांगला स्रोत आहे. ब्रेकफास्टसाठी तुम्ही ब्राऊन ब्रेड खाऊ शकता.
  • सुका मेवा देखील खाल्याने आरोग्यास फायबर मिळण्यास मदत होईल.
  • गव्हाचे पीठ फायबरचा चांगला स्रोत असून मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरा.
  • ओट्समध्ये फायबर भरपूर असतात. न्याहारीमध्ये ओट्सचा समावेश करणे आवश्यक आहे. ओट्समध्ये बीटा ग्लूकन नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे लेबल कमी होते आणि प्रतिकारशक्ती सुधारते

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -