Adulterated cloves : भेसळयुक्त मसाले कसे ओळखाल?

लाल मिरची, हळद, दालचिनी, काळी मिरी आणि इतर मसाल्यांमध्ये ज्याप्रमाणे भेसळ केली जात आहे, त्याचप्रमाणे लवंगातही भेसळ केली जात आहे, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका नाही. अशा परिस्थितीत लवंगातील भेसळ ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरते.

Adulterated cloves: How to identify adulterated spices?
Adulterated cloves : भेसळयुक्त मसाले कसे ओळखाल?

आपण बाजारातून एखादी वस्तू घेताना ती पारखून घेत असतो. प्रामुख्याने खाद्यपदार्थ विकत घेताना आपण विशेष काळजी घेत असतो. तरीसुद्धा अनेकदा आपली फसवणूक झाल्याचे समोर येते. गृहिणी ह्या स्वयंपाकघरात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यास प्रयत्न करत असतात.याशिवाय जेवण हे रुचकर होण्यासाठी स्वयंपाकात दर्जेदार मसाले वापरण्यासाठी अन्नदात्यांची धडपड सुरु असते. असाच एक मसाला आहे ज्याने जेवणाची लज्जत वाढते. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि पचनसंस्थेचे काम व्यवस्थितरित्या करण्यासाठी लवंग हे नैसर्गिक औषध ठरले आहे. लवंगामध्ये असणारे युजेनॉल तेल दातदुखीपासून खूप आराम देते.पण तुम्हाला माहीत आहे का? या लवंगातही भेसळ असू शकते. लाल मिरची, हळद, दालचिनी, काळी मिरी आणि इतर मसाल्यांमध्ये ज्याप्रमाणे भेसळ केली जात आहे, त्याचप्रमाणे लवंगातही भेसळ केली जात आहे, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका नाही. अशा परिस्थितीत लवंगातील भेसळ ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरते. FSSAI ने नुकतीच लवंगाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सोपी चाचणी आणली आहे. त्याच्या मदतीने तुम्ही भेसळयुक्त लवंग ओळखू शकता.

असे ओळखा भेसळयुक्त लवंग

  • यासाठी प्रथम दोन ग्लास पाणी घ्या.
  • दोन्हीमध्ये लवंग ठेवा
  • लवंग जर काचेच्या पाणी भरलेल्या ग्लासात खालच्या बाजूस गेली तर लवंग शुद्ध आहे.
  • दुसरीकडे, जर लवंग पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असेल तर याचा अर्थ डिस्टिलेशनच्या मदतीने त्यात असलेले तेल काढण्यात आले असून ही भेसळयुक्त लवंग आहे.
  • भेसळ लवंगांच्या तुलनेने खऱ्या लवंगा तिखट असतात

हेही वाचा – Omicron Affects Throat: ओमिक्रॉनने घशातील खवखव कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ