लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड आता सर्वत्र पाहायला मिळतो आहे. या नात्यात दोन व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहतात. आजकाल बरेच जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. या नात्यात दोघेजण पती – पत्नीसारखे एकत्र राहतात. काहींना लिव्ह इन रिलेशनशिपचा चांगला अनुभव येतो तर काहींना वाईट अनुभव येतो. जुनी पिढी लिव्ह इन रिलेशनशिपच्या पूर्णपणे विरोधात आहे. यामुळे नात्यांचे महत्त्व विसरत आहे, असा काहींचा विश्वास आहे. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये असलेल्या लिव्ह इन रिलेशवशिपचे फायदे आणि तोटे,
लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे –
- रिलेशिपनमध्ये राहून जोडीदाराला समजून घ्यायचे असेल तर लिव्ह रिलेशनशिप उत्तम पर्याय आहे. यामुळे जोडीदार एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.
- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहून एकमेकांच्या सवयी आणि लाइफस्टाइल समजता येते, ज्यामुळे भविष्यात तुम्ही एकमेकांसाठी अनोळखी राहत नाही.
- लिव्ह इन रिलेशनशिपमुळे तुम्हाला हवे तेव्हा वेगळे होता येते.
- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकमेकांच्या आई वडिलांचा सहभाग नसतो. अशी जोडपी स्वत:ची भांडणे , प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न करा.
- दोघेही वर्किंग असल्याने जबाबदारी वाटून घेतली जाते. एकमेकांना जबाबदारीची जाणीव होण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय चांगला आहे.
- लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याने नातेसंबंध समजून घेणे खूप सोपे जाते. यामुळे तुम्हाला एकमेकांना ओळखता येते. तसेच एकमेकांसोबत पटत नसेल तर वेगळेही होता येते, हा घटस्फोटापेक्षा उत्तम पर्याय आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपचे तोटे –
- लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये जास्त सेल्फ लाइफ नसते. यात बंधने नसल्याने थोड्याशा वादविवादाने मतभेद होतात.
- लिव्ह इन रिलेशनशिपमधील अनेक जोडपी घरच्यांना न सांगता एकत्र राहतात. ज्यामुळे गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण होते.
- लग्न न करता एकत्र राहिल्याने काही वर्षानंतर नात्यात अविश्वास निर्माण होतो.
- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये , जर तुमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले आणि हे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: मुलींचे भविष्य धोक्यात येऊ शकते.
- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहिल्याने, लग्नानंतर दोघांसाठी एकमेकांबद्दल जाणून घेण्यासाठी नवं असं काहीच उरत नाही. ज्यामुळे अनेकदा नात्यात रटाळपणा येतो.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde