बहुतेकजण जेवल्यानंतर गोड खातात. काहींना तर रोजची गोड खाण्याची सवय असते, एक दिवस जरी गोड खायला मिळालं नाही तर चुकल्यासारखं वाटते. पण, आरोग्याच्यादृष्टीने ही सवय योग्य नाही. चवीला गोड असणारे हे पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होतात, हे आपण कोणीच लक्षात घेत नाही. अनेकांना गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. पण, असे करणं कितपत योग्य आहे? गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यावर रक्तातील साखर वाढते का? जाणून घेऊयात आजच्या लेखातून या प्रश्नांची उत्तरे
डायबिटीसचा धोका –
डॉक्टरांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल तर त्यांनी गोड खाणे टाळायला हवे. जर तुम्ही कधीतरी गोड खात असाल तर लगेच पाणी पिणे टाळावे. कारण गोड पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने डायबिटीसचा धोका निर्माण होतो.
गोडावर लगेच पाणी का पिऊ नये?
डॉक्टरांच्या मते, गोड खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसते. खरं तर, जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा शरीरात ग्लुकोज झपाट्याने शोषले जाते. अशावेळी साखरेची पातळीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे गोड पदार्थ जेव्हा तुम्ही खाल तेव्हा लगेच पाणी पिऊ नये. कमीत कमी 30 मिनिटे तरी पाणी पिऊ नये, असे तज्ञ सांगतात.
गोड खाल्ल्यानंतर तहान कमी करण्याचे उपाय –
- गोड खाल्ल्यावर तहान कमी करण्याचे खारट पदार्थ खावेत.
- गोड पदार्थ खावेसे वाटतात तर फळे खाऊ शकता.
- पाणी तुम्ही पिऊ शकता.
हेही पाहा –