Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Afternoon nap...दुपारची डुलकी म्हणजे या आजारांना आमंत्रण

Afternoon nap…दुपारची डुलकी म्हणजे या आजारांना आमंत्रण

Subscribe

काही लोकांना दुपारी झोपण्याची सवय असते. काही मिनिटांसाठी का होईना डोळे बंद केले तरीही फ्रेश वाटू शकते. ऐवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी झोप न झाल्याने सुस्ती, चिडचिडेपणा आणि थकवा दूर होतो. परंतु अधिक वेळ दुपारी झोपल्यास याचा उलट परिणाम ही होऊ शकततो. ऐवढेच नव्हे तर संपूर्ण दिवस तुम्हाला भीती वाटू शकते. तुमची ही सवय तुम्हाला काही आजारांना निमंत्रण देऊ शकते. जसे की, मधुमेह, हृदयासंबंधित आजार असे.

दुपारच्या पॉवर नॅपचे नुकसान
बोस्टनमध्ये ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील संशोधकांनी ३ हजारांपेक्षा अधिक लोकांचे सॅम्पल घेतले. संशोधकांनी झोप आणि त्याचा कालावधीसह लठ्ठपणासह मेटाबोलिक सिंड्रोमची तपासणी केली. त्यानुसार लोकांनी ३० मिनिट अथवा त्यापेक्षा अधिक वेळ झोप घेतलेल्या लोकांमध्ये हाय बीएमआय, हाय ब्लड प्रेशर आणि हृदय रोगासह मधुमेहासंबंधित आजार होऊ लागतात. परंतु या संदर्भात अधिक रिसर्च होणे बाकी आहे.

- Advertisement -

परंतु जी लोक रात्री झोपत नाहीत त्यांना दुपारची झोप लागते. पण मर्यादेपेक्षा अधिक वेळ झोपल्याल तर नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त सकाळी झोपल्यानंतर झोपेची गुणवत्ता ही प्रभावित होऊ शकते.


हेही वाचा- डोकं न दुखताही होऊ शकतो Migraine

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini