घरभक्तीAkshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा 'हे' धातू, होईल धनलाभ

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी खरेदी करा ‘हे’ धातू, होईल धनलाभ

Subscribe

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस हा शुभ मानला जातो. या दिवशी सोनं, चांदींची खरेदी केली जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी धातु स्वरुपात देवी लक्ष्मीला घरी आणले जाते. अक्षय्य तृतीयेचा सण हा वैशाख महिन्यातील शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. येत्या २२ एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.

परंतु तुम्हाला जसे शक्य होईल त्यानुसार तुम्ही सोनं अथवा चांदीचे दागिने खरेदी करु शकता. अशातच यंदाच्या अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार तुम्ही एखादा धातु खरेदी केल्यास तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

- Advertisement -

मेष:
मेष राशीतील लोक या दिवशी तांब्याचे अथवा सोन्याची खरेदी करु शकतात. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने त्यासाठी शुभ धातू तांब आहे.

वृषभ:
या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्याने त्यांनी या दिवशी चांदी खरेदी करावी. शुक्रासाठी खरंतर हिरा रत्न प्रमुख मानले जाते.

- Advertisement -

मिथुन:
ज्योतिष शास्रानुसार मिथुन राशींतील लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांनी कांस धातुची भांडी किंवा आभूषणे खरेदी करु शकता.

कर्क:
कर्क राशीतील लोकांनी चांदी खरेदी करु शकतात. यांचा स्वामी चंद्र असल्याने त्यांच्यासाठी चांदी शुभ मानली जाते.

सिंह:
या राशीतील लोकांचा स्वामी ग्रह सूर्य असल्याने तांबे अथवा सोनं तु्म्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी करु शकता.

कन्या:
या राशीचा स्वामी ग्रह बुध असून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही लोक कांस खरेदी करु शकतात.

तुळ:
अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ असल्याने या राशीच्या व्यक्ती चांदी खरेदी करु शकतात. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे.

वृश्चिक:
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या दिवशी तांबे खरेदी करणे उत्तम राहिल. यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे.

धनु:
याचा स्वामी ग्रह देव गुरु असल्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ किंवा सोनं खरेदी करु शकता.

मकर:
मकर राशीची लोक या दिवशी स्टिल अथवा लोखंडाची भांडी खरेदी करु शकतात. कारण या राशीचा स्वामी ग्रह शनि देव आहे.

कुंभ:
कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि असल्याने त्यांनी लोखंडाची भांडी खरेदी करावीत.

मीन:
मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. ही लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ धातुची खरेदी करु शकतात. या व्यतिरिक्त सोनं सुद्धा तुम्ही खरेदी करु शकता.

 


हेही वाचा: Akshaya Tritiya 2023 : यंदा अक्षय्य तृतीयाला बनणार 6 शुभ योग; जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -