Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरातून फेकून द्या गोष्टी, अन्यथा...

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरातून फेकून द्या गोष्टी, अन्यथा दारिद्रय लागेल मागे

Subscribe

येत्या २२ एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. या शुभ मुहूर्ताचे हिंदू धर्मात फार मोठे महत्व आहे. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यासोबत या दिवशी सोनं खरेदी करणे फार शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त घरात जश्या तुम्ही नव्या गोष्टी खरेदी करुन आणता. त्याचप्रमाणे या दिवशी काही गोष्टी घरातून बाहेर फेकल्या तर तुमच्या आयुष्यासाठी फार फायदेशीर ठरतली. अन्यथा तुमच्या मागे दारिद्रय लागू शकते.

-घरात-चप्पल बुट ठेवू नका
असे मानले जाते की, जुने, फाटलेले किंवा घराब झालेली बुट अथवा चप्पल घरात ठेवल्याने दारिद्र येते. अशातच अक्षय्य तृतीयाच्या दिवशी अशी बुट-चप्पला फेकून द्या. या व्यतिरिक्त घराच्या दरवाज्या समोर चप्पल-बुट काढू नका.

- Advertisement -

-तुटलेला तवा अथवा पोलपाट-लाटण ठेवू नका
तवा, पोलपाट किंवा लाटण जे जर तुटले असेल तर ते फेकून द्या. यामुळे दोष लागतो. त्याचसोबत अशा तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये असा सल्ला नेहमीच दिला जातो. यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही अशा तुटलेल्या वस्तू फेकून देऊ शकता.

- Advertisement -

-घरात झाडू ठेवू नका
झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानले जा. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिची पुजा केली जाते. अशातच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराब झालेली अथवा तुटलेली झाडू ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.

-फाटलेले देवाचे कपडे
जर घरात तुम्ही देवासाठी वापरत असेलेल कापड फाटले असेल तर ते वापरु नका. अक्षय्य तृतीयेला तु्म्ही घरातून फाटलेले देवाचे कपडे एखाद्या जमिनीखाली गाढा. कारण देवाचे कपडे नेहमीच स्वच्छ असावेत.

-घरात कचरापेटी ठेवू नका
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात जुनी कचरापेटी किंवा खराब झालेली कचरापेटी अजिबात ठेवू नका. त्याचसोबत अस्वच्छ अशा कोणत्याच गोष्टी घरात ठेवू नका.

वरील काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरातून बाहेर फेकून द्या. जेणेकरुन दारिद्र मागे लागण्याऐवजी सुख-समृद्धी तुम्हाला लाभेल.

 


हेही वाचा: अक्षय तृतीयाचा काय आहे इतिहास

- Advertisment -