एलोवेराचे फायदे आजकाल सर्वांनाच माहिती आहेत. बहुतांश लोक एलोवेराला ब्युटी बेनिफिट्ससाठी वापर करतात. मात्र तुम्हाला माहितेय का, याचा एकूणच आरोग्यावर ही सकारात्मक फायदा होतो. एक्सपर्ट्सच्या मते, एलोवेरा ज्यूसचा डाएटमध्ये समावेश केल्यास काही समस्या दूर होऊ शकतात. अशातच एलोवेरा ज्यूसमुळे कोणते फायदे होतात याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
कब्जसाठी फायदेशीर
एलोवेरा ज्यूस प्यायल्याने कब्जच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. एक्सपर्ट्सच्या मते, यामध्ये फायबर आणि अँन्टीऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. यामध्ये वॉटर कंटेट ही अधिक असतो. अशातच यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त लॅक्सेटिव्ह असते. अशातच कब्जची समस्या असेल तर तुम्ही एलोवेरा ज्यूस पिऊ शकतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
एलोवेरा ज्यूस डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये बीटा कॅरेटीनचे प्रमाण अधिक असते. जे एक अँन्टीऑक्सिडेंटच्या रुपात नारंगी किंवा पिवळ्या रंगाच्या भाजीत आढळते. तुमचे शरीर बीटा कॅरोटीनला व्हिटॅमिन ए मध्ये बदलतो. हे व्हिटॅमिन एकूणच आय हेल्थसाठी फायदेशीर असते.
मधुमेह
एलोवेरा ज्यूस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार फायदेशीर असतो. एक्सपर्ट्सच्या मते, एलोवेरा रक्तातील शर्कराचा स्तर नियंत्रित करण्यात मदत करतो. एलोवेरा ज्यूस टाइप-2 मधुमेहाचे रुग्ण पिऊ शकतात.
रोगप्रतिराकशक्ती वाढते
एलोवेरात असलेल्या व्हिटॅमिन सी एकूणच आरोग्यासाठी गरजेचे असते. हे एक नैसर्गिक अँन्टीऑक्सिडेंट असतात जे सूजेच्या विरोधात लढण्यास मदत करतात.
हेही वाचा- रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘ब्लॅक टी’ आहे गुणकारी