Friday, April 19, 2024
घरमानिनीHair Oiling Tips : केसांना केव्हा आणि किती तेल लावावे जाणून घ्या

Hair Oiling Tips : केसांना केव्हा आणि किती तेल लावावे जाणून घ्या

Subscribe

आयुर्वेदात केसांना तेल लावण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

केसांना तेल लावणे हे आपल्याला खूप कंटाळवाणे वाटते. अशातच आता उन्हाळा चालू झाला आहे. आणि या उन्हाळ्यात किती तेल लावले पाहिजे आणि केसांची कशी निगा राखली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. केसाला तेल लावणे हि खूप महत्वाची गोष्ट आहे. आयुर्वेदात केसांना तेल लावण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तेल लावल्याने केसांचे पोषण होते आणि कोरडेपणाही दूर होतो. केसांना तेल लावणे हा एक उत्तम केसवाढीसाठीचा उपचार आहे. यामुळे केस मऊ आणि निरोगी होतात.
Do you know how to oil your hair right? Follow these tips and tricks |  HealthShots
आता आपण जाणून घेऊया केसाला तेल लावल्याने कोणते फायदे होतात-
  • तेलाने मसाज केल्यावर मेंदूला उत्तम चालना मिळते.
  • केसाला तेल लावल्याने केसाला पोषक  घटक मिळतात.
  • त्यामुळे  केसांना योग्य पोषण मिळते.
  • म्हणूनच हलका मसाज करत केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे.
  • तेलाच्या मसाजमुळे टाळू निरोगी राहतो.
  • तसेच टाळूचे रक्ताभिसरण होते आणि केसाला पोषण मिळते.
  • केस कोरडे आणि खराब होण्यापासून त्यांचा बचाव होतो.
Dos and donts of oiling your hair | Be Beautiful India
तेल लावताना अशी घ्या केसांची काळजी-
  • तेल लावताना केसांना जोरात चोळू नये. तेल लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा.
  • जर केसात कोंडा असेल तर कापसाच्या साहाय्याने टाळूला कोमट तेल लावा.
  • तेल लावल्यानंतर केस हलक्या हाताने हळुवारपणे सोडावा.
  • आठवड्यातून दोनदा केस कोरडे असताना शैम्पू करा.
  • शॅम्पू करण्यापूर्वी रात्री केसांना तेल लावा.
  • असे केल्याने केस आणि टाळूला तेल शोषण्यास मदत होते, ज्यामुळे केस मऊ आणि मजबूत होतात.
  • केस खूप तेलकट असतील तर तेल लावणे टाळा.

हेही वाचा :

Womens Tips : ऑफिसला जाणाऱ्या महिलांनी ‘अशी’ घ्यावी त्वचेची काळजी

- Advertisment -

Manini