Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship रागीट नवऱ्याला असं करा कंट्रोल

रागीट नवऱ्याला असं करा कंट्रोल

Subscribe

तुम्ही नवऱ्याबद्दल असा किती वेळा विचार केलायं,’तो खुप चांगला व्यक्ती आहे. केवळ त्याने त्याचा राग कंट्रोल केला तर सर्वकाही व्यवस्थितीत होईल.’ एखाद्या तापट स्वभाच्या व्यक्तीसोबत लग्न करणे खाऊचे काम नाही. त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे असेल तर काही गोष्टी जपूनच कराव्या लागतात. नवऱ्याच्या तापट स्वभामुळे बहुतांश महिलांमध्ये तणाव, चिंता आणि निराशा निर्माण होते. जर यावर वेळीच कंट्रोल केले नाही तर तुमच्या नात्यात वाद अधिक वाढू शकतात. वास्तवात तुम्हाला खरंच नवऱ्याने आपला राग शांत करावा असे वाटत असेल तर पुढील टीप्स जरुर वाचा. (Angry husband control tips)

धैर्य ठेवा
आपले इमोशन्स कंट्रोल करणे फार कठीण काम असते. अशातच जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत दिवसातून तीन- चार वेळा राग काढत असेल तर स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वसामान्यपणे राग व्यक्त करण्यामागे काही कारणं ही असू शकतात. पण तो जेव्हा रागात असतो तेव्हा तुमचा राग वाढू देऊ नका. यामुळे स्थिती अधिक बिघडली जाईल. धैर्य ठेवा आणि नवऱ्याचा राग शांत झाला की त्याच्याशी बोला.

- Advertisement -

रचनात्मक संवाद
जर पार्टनर नेहमीच रागात असेल तर त्यामागील कारणं समजून घ्या. तसेच घरात जर नेहमीच तणावाचे वातावरण असेल आणि तुमच्या दोघांना एकमेकांशी बोलता येत नसेल तर घराबाहेर जाऊन एकट्यात संवाद साधा. त्याच्या भावना समजून घेत त्यावर तोडगा काढा.

- Advertisement -

माइंड-रिडिंगपासून दूर रहा
लग्न होऊन काही महिने झाले असतील किंवा काही वर्ष. त्यामुळे नवऱ्याच्या तापट स्वभावाचे कारण नेहमीच तुम्ही असाल असे कधीच मानू नका. त्याच्या मनात काय चालले याचा सतत विचार करत बसू नका. यामुळे तुमच्या मनात संशय निर्माण होईल आणि नात्यावर याचा थेट परिणाम पडेल.

मर्यादा ठेवा
काही वेळा असे होऊ शकते की, नवरा मानसिक किंवा शारिरीक रुपात अपमान करु शकतो. अशातच तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. जर त्याला प्रत्येकवेळी राग येत असेल आणि तो राग सतत तुमच्यावर काढत असेल तर त्याला त्याच्या मर्यादा क्रॉस करण्यास देऊ नका. (Angry husband control tips)

तज्ञांनी मदत घ्या
गरज पडल्यास तज्ञांची तुम्ही मदत घ्या. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप याला एक ना एक दिवस व्यक्ती कंटाळतो. अशातच नवऱ्याच्या रागीट स्वभावावर नक्की काय करावे हे तुम्हाला कळत नसेल तर तज्ञांची जरुर मदत घ्या.


हेही वाचा- Relationship…. टॉक्सिक आणि केअरिंग पार्टनरमध्ये असतो ‘हा’ फरक

- Advertisment -

Manini