घरताज्या घडामोडीStrawberry Face Packs: तजेलदार त्वचेसाठी लावा स्ट्रॉबेरीचा पॅक; जाणून घ्या कसा करायचा...

Strawberry Face Packs: तजेलदार त्वचेसाठी लावा स्ट्रॉबेरीचा पॅक; जाणून घ्या कसा करायचा पॅक?

Subscribe

लालसर स्ट्रॉबेरी दिसायला जेवढी छान असते तेवढीच स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. आंबट-गोड स्ट्रॉबेरी असे फळ आहे, जे खायला मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडते. व्हिटॅमिन सी युक्त स्ट्रॉबेरी प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते, शिवाय काही आजारावर उपचार करते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी तितकी फायदेमंद आहे, तितकी त्वचेसाठीही उपयुक्त आहे. जर तुम्हाला तजेलदार आणि डाग नसलेला चेहरा हवा असेल तर स्ट्रॉबेरीचा जरूर वापर करा. स्ट्रॉबेरी त्वचेसाठी सुपरफूड आहे, जे निस्तेज चेहऱ्यावर चमक आणते.

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असलेली स्ट्रॉबेरी त्वचेच्या जळण्यावर उपचार करते. शिवाय त्वचेची सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करते. याचा वापर केल्याने वाढत्या वयाचा परिणाम कमी होतो. स्ट्रॉबेरीमध्ये अल्फा-हायड्रॉक्सिलिक अॅसिड असते, जे त्वचेला मृत पेशीपासून मुक्त होण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावरील पुरळ यावर उत्तम उपचार स्ट्रॉबेरी करते. यामध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड पुरळ जाण्यास मदत करते. अनेक गुणधर्म असलेल्या स्ट्रॉबेरीचा त्वचेवर कसा वापर करावा हे आज आपण जाणून घेऊयात.

- Advertisement -

पुरळमुक्त होण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम मास्क कसे तयार करावे

स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम मास्क बनवण्यासाठी सर्वात पहिल्या एक वाटीत स्ट्रॉबेरीची प्युरी घ्या. जर त्वचा जास्त ड्राय आहे, तर फ्रेश क्रीमचा वापर करा. जर त्वचा ऑयली असेल तर त्यासाठी स्ट्रॉबेरीसोबत दह्याचा वापर करा. हे व्यवस्थित मिसळून चेहऱ्यावर लावा. जवळपास १० मिनिटे हा फेसबॅक लावून झाल्यानंतर गरम पाण्याचे चेहरा धुवा. हा फेसपॅक पुरळ घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे.

चेहऱ्यावरचा टॅन घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि लिंबूचा फेसपॅक

जर तुमची त्वचा टॅन झालेली असेल तर स्ट्रॉबेरी आणि लिंबूच्या फेसपॅकचा वापर करा. हा बनवण्यासाठी एका वाटीत स्ट्रॉबेरी आणि एक मोठा चमचा लिंबूचा रस मिसळला. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावा. जवळपास १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर फेसपॅक लावा त्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुवा.

- Advertisement -

स्ट्रॉबेरी आणि दहीचा फेस मास्क

दहीत अँटीऑक्सीडेंट असते, जो चेहरा स्वच्छ करते आणि पुरळांवर त्यांचा उपचार होतो. या फेस मास्क बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही काही स्ट्रॉबेरी मॅश करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा दही घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करा. मग फेसमास्क चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांपर्यंत ठेवा. १५ मिनिटांनंतर गरम पाण्याने चेहरा धुवा.


हेही वाचा – OSA ज्या आजाराने बप्पी लहरींचे निधन झाले, नेमका काय आहे ‘ओएसए’ आजार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -