सण किंवा इतर खास कार्यक्रमांसाठी चेहरा तेजस्वी आणि सुंदर दिसणे खूप महत्वाचे असते. आपल्या भारतीय संस्कृतींमध्ये सणांच्या प्रसंगी सुंदरता, स्वच्छता, आणि तयार होणे याला विशेष महत्त्व दिले जाते. त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी हे प्रत्येकाला माहित असले पाहिजे. हे सर्वात महत्वाचे आहे, अन्यथा तुमच्या त्वचेचा रंग दिवसेंदिवस निस्तेज होऊ लागतो. यासाठी तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर कमी करावा. केमिकल प्रॉडक्टमुळे आपल्या त्वचेवर मुरूमं, डाग इत्यादी समस्या उद्भवू शकतात. या समस्यांना सामोरे न जाण्यासाठी तुम्ही घरीच फेसपॅक बनवू शकतात. आज आपण जाणून घेऊयात ग्लोइंग आणि सुंदर त्वचेसाठी कोणता फेसपॅक लावला पाहिजे.
तुळशी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक
जर तुमच्या त्वचेवर डाग, मुरूमं असतील, तर तुम्ही तुळशी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. हा फेसपॅक लावल्याने चेहरा चांगला उजळतो.
फेसपॅक बनवण्याची पद्धत
- तुळशीची पाने पाण्यासोबत बारीक करून घट्ट पेस्ट बनवावी लागेल.
- आता मुलतानी मातीची पावडर घाला. यामध्ये थोडे गुलाबपाणी मिसळा.
- नंतर नीट पेस्ट मिक्स करून चेहऱ्यावर लावा.
- यानंतर ते कोरडे होऊ द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
- हा फेस पॅक लावल्याने तुमचा चेहरा चांगला उजळेल.
दूध आणि बेसन फेसपॅक
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दूध आणि बेसनही वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा देखील तेजस्वी आणि टॅनिंग देखील कमी होते. हे तुमच्या चेहऱ्यावर आठवड्यातून 1 ते 2 वेळा लावू शकता. दूध आणि बेसनाच्या फेसपॅकमुळे तुम्हाला त्वचेशी निगडित कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
फेस पॅक कसा बनवायचा
- 1 चमचा बेसनामध्ये 2 चमचे दूध आणि अर्धा चमचा हळद मिसळा.
- फेसपॅक बनवल्यानंतर चेहऱ्याला लावा.
- 20 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
- हा फेस पॅक आठवड्यातून एकदा लावा.
हे फेसपॅक लावल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक दुप्पट होईल. तसेच, तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त फेसपॅक वापरण्याची देखील गरज नाही.
हेही वाचा : Hairfall Remedies : केस गळती रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय
Edited By : Prachi Manjrekar