फुले आनंदाचे आणि सकारात्मकतेचे, समाधानाचे प्रतीक आहेत. फूलांचा उपयोग केवळ पूजेतच नाही तर घराच्या सजावटीसाठी करण्यात येतो. महिलामंडळी केसात फुलांचा गजरा माळतात किंवा साजश्रुंगारात त्याचा वापर करतात. स्वप्नशास्त्रानुसार, फुले आपल्याला भविष्याशी संबंधित चिन्हे दर्शवितात. स्वप्नशास्त्रात स्वप्नात फूले पाहण्याचा अर्थ सांगण्यात आला आहे. तुम्हालाही स्वप्नात फूल दिसतात का? चला तर मग जाणून घेऊयात, या स्वप्नांचा अर्थ काय असतो.
- जर स्वप्नात तुम्हाला पांढरी फूले दिसली तर हे शुभसंकेत आहे. पांढऱ्या रंगाची फुले पाहणे म्हणजे यशाचे प्रतीक मानले जाते.
- पांढऱ्या फुलांप्रमाणेच लाल फूलही शुभ संकेत दर्शवितात. पण, तुम्ही ही फुले झाडावरून पडताना पाहिलीत तर हे संकटांचे संकेत असू शकते.
- स्वप्नात फूले तोडताना पाहणे म्हणजे आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होण्याचे संकेत असतात.
- तुम्ही जर स्वप्नात फूले गोळा करताना दिसलात तर शुभ मानले जाते. स्वप्नात फूले गोळा करताना दिसणे म्हणजे आनंद आणि लवकरच प्रगती होण्याचे संकेत असतात.
- स्वप्नात फुलांचा हार दिसला तर घरात शुभ घडणार असे स्वप्नशास्त्रात सांगण्यात आले आहे.
- स्वप्नात गुलाब पाहणे म्हणजे प्रेम आयुष्यात येणार असा अर्थ असतो.
- कमळाचे फूल स्वप्नात पाहणे खूप शुभ असते. कमळाचे फूल लक्ष्मी देवीचे आवडते आहे. त्यामुळे हे फूल स्वप्नात दिसणे याचा अर्थ तुमच्यावर देवीची कृपा आहे, असा सांगितला जातो.
- स्वप्नात झेंडूचे फूल पाहणे म्हणजे तुमच्या हातून मोठे काम होणार आहे.
- स्वप्नात फुलांची बाग पाहणे शुभ संकेत असतात. फूलांची बाग दिसणे याचा अर्थ आयुष्यात लवकरच यश तुमचे दार ठोठावणार आहे, असे सांगितले जाते.
- तुम्ही तुमच्या केसात फूल माळताना दिसत असाल तर याचा अर्थ तुमचा आर्थिक विकास होणार आहे. तुम्ही व्यावसायिक असाल तर खूपच शुभ मानले जाते.
- स्वप्नात सूर्यफूल पाहणे आयुष्यात लवकरच मोठी संधी मिळणार असल्याची संकेत असतात.
- स्वप्नात सुकलेली फूले पाहणे अशुभ असते. अशी स्वप्ने निराशेचे प्रतीक असतात.
हेही पाहा –