घरताज्या घडामोडीसावधान! तुम्हीही घेताय का काढे आणि व्हिटामीनच्या गोळ्या? मग हे वाचा

सावधान! तुम्हीही घेताय का काढे आणि व्हिटामीनच्या गोळ्या? मग हे वाचा

Subscribe

कोरोना महामारीपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. यासाठी जर तुम्ही रोज गरम मसाले टाकून उकळलेले काढे पिण्याबरोबरच व्हिटीमीनचा मारा करणाऱ्या गोळ्या घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण काढ्यांच्या आणि गोळ्यांच्या अतिसेवनाने अनेकांना भलतेच आजार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे तज्त्रांच्या सल्ल्याशिवाय काढे व गोळ्याचे सेवन न करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

कोरोनावर कोणताही प्रभावी उपाय सापडत नसल्याने गेल्या वर्षांपासून अनेकांनी आयुर्वेदाचा आधार घेतला. त्यात काळी मिरी, लवंग, दालचिनी व इतर गरम मसाल्याचे जिन्नस टाकून बनवलेले काढे पिण्याचा ट्रेंडच सुरू झाला. काहीजण तर अजूनही हे काढे पित असून त्यांना आता पोटाविषयी समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यात काहीजणांना बद्धकोष्ठ, पाईल्स, फिशरची व्याधी झाली आहे. तर काढ्यांच्या अतिसेवनामुळे काहीजणांवर शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत. यामुळे इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली स्वत;च्या शरीरावर प्रयोग न करण्याचा सल्ला तज्त्रमंडळी देत आहेत. त्यातच शरीराला आवश्यक तेवढ्याच व्हिटामीन्सची गरज असते. पण सध्या सगळेजण कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्हिटीमीन्सच्या गोळ्या खात आहेत. यामुळे मर्यादेपेक्षा जास्त व्हिटीमीन्स शरीरात गेल्यानेही अनेकांना त्रास होऊ लागला आहे. अशा व्यक्तींना लेजर थेरपी द्यावी लागत असून काहीजण औषध गोळ्या खाऊनही बरे होत आहेत.

- Advertisement -

तर व्हिटीमीन्सचा ओव्हरडोस झाल्याने हायपर अॅसिडीटी, जुलाब, पोटात जळजळ, पोटदुखीच्या समस्या काहींना होत आहेत. त्यातही व्हिटामीन डी च्या ओव्हरडोसमुळे बद्धकोष्ठसारख्या समस्या होतात तर व्हिटामीन सी च्या अतिसेवनामुळे अतिसाराचा त्रास होतो. यामुळे स्वत: डॉक्टर बनू नका तज्त्रांचा सल्ला घ्या असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -