घरलाईफस्टाईलअसा करावा फलाहार

असा करावा फलाहार

Subscribe

सर्वसाधारणपणे आपण सर्वच सकाळी, दुपारी आणि रात्री पोटभर जेवण करतो. मात्र तरीही मधल्या वेळेत भूक लागते. अशावेळी काहीतरी अरबटचरबट खाऊन आपण वेळ मारून नेतो. परिणामी नकळत अनेक आजारांना आपण आमंत्रण देतो. त्याऐवजी मधल्या वेळेस फलाहार करावा. विविध फळांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्व मिळतात. तसेच शरीराला आवश्यक साखर फळांद्वारे नैसर्गिकरित्या मिळते.

आपल्यातील बर्‍याच जणांना सकाळी न्याहारीसह किंवा रात्री जेवल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. या दोन्ही वेळेस फळे खाणे टाळावे. लक्षात ठेवा, जेवणाआधी 1 ते 2 तास फलाहार करावा. असा फलाहार पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतं. शक्यतो रात्रीचा जेवणानंतरचा फलाहार टाळावा. रात्री जेवणानंतर फळे खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. परिणामी शांत झोपेस आपण मुकतो.

- Advertisement -

जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर लगेच फलाहार करू नये. मग फलाहार करण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ज्यांना सकाळी न्याहारीबरोबर फळे खाण्यास आवडतात, त्यांनी सकाळी न्याहारीपूर्वी 1 ते 2 तास अगोदर फलाहार करावा. त्यानंतर दुपारी 12 वाजता तर सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान फळांचे सेवन करावे. दिवसभर योग्य वेळी फळांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

सर्वात महत्त्वाचे, एकच प्रकारची फळे न खाता प्रत्येक मोसमातील फळे खावीत. फळांमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि असे बरेच महत्त्वाचे घटक असल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेले सगळे पदार्थ यामधून मिळतात. गरोदर स्त्रियांनीही डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार फलाहार करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -