Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health Artificial Sweeteners चा अधिक वापर आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Artificial Sweeteners चा अधिक वापर आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Subscribe

जर तुम्ही तुमच्या दररोजच्या चहा किंवा कॉफी मध्ये साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करत असाल तर थांबा. कारण आर्टिफिशियल स्वीटनर तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. याबद्दल डब्लूएचओने एक अलर्ट जारी केला आहे. डब्लूएचओने इशारा देत असे म्हटले आहे की, या स्वीटनरचा वापर केल्याने लठ्ठपणा आणि हृदय रोगासंबंधित आजार होण्याचा धोका आहे.

आजकाल बहुतांश लोक साखरेला पर्याय म्हणून नॉन-शुगर स्वीटनरचा खुप वापर करतात. गेल्या पाच वर्षांमध्ये याचा वापर फार वाढला गेला आहे. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेले रुग्ण आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करत आहेत. ज्या लोकांना हे आजार नसतात ती लोक सुद्धा याचा वापर करतात. खासकरुन अधिक उत्पन्न असलेल्या वर्गात साखरेऐवजी याचाच अधिक वापर केला जातो. परंतु अशा स्वीटरनाच काहीच फायदा होत नाही. उलट आजारांना आमंत्रण दिले जाते.

- Advertisement -

स्वीटनरचा वापर शरिरातील फॅट कमी करणे किंवा साखरेमुळे होणारे नुकसान कमी होत नाही. पण लोक याचा वापर टाइप-२ मधुमेह, हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढतो. डब्लूएचओने असे म्हटले आहे की, स्वीटनरच्या मदतीने वजन कमी होत नाही. उलट शरिरात मेटाबॉलिज्मची क्रिया मंदावतो. ज्यामुळे काही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

डब्लूएचओने असे म्हटले आहे की, स्वीटनरचा वापर केल्याने हृदयासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. काही रिसर्च मधून हे सुद्धा समोर आलेले नाही की, याचा वापरामुळे रक्तातील साखरेचा स्तर हा नियंत्रणात राहील. जर शरिरात लठ्ठपणा वाढत असेल तर यापासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्यात बदल आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे.


हेही वाचा- उच्च रक्तदाबाचा मासिक पाळीवर होणारा परिणाम

- Advertisment -

Manini