वेगवेगळ्या कारणांमुळे आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अस्थमा अर्थात दम्याचा त्रास होऊ शकतो. दम्याच्या त्रासामुळे श्वास घेण्यात अडथळा , खोकला, घशात होणारी घरघर अशा अनेक समस्या निर्माण होतात. अस्थमाची लक्षणे जितक्या लवकर ओळखली जातील, तितक्या लवकर दम्याचा उपचार करणे शक्य आहे. तसं पाहायला गेलं तर यापासून मु्क्तता मिळवण्याकरता औषधे आवश्यक आहेतच पण तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहू शकता. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात दम्याची लक्षणे काय आहेत आणि यापासून घरगुती उपाय करून सुटका कशी मिळवावी याबद्दल.
दम्याची लक्षणे :
दम्याचे पहिले लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे.
वारंवार खोकला.
श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज.
छातीत जडपणा आणि जखडलेपण.
धाप लागणे.
खोकण्यात अडचण आणि कफ बाहेर काढण्यास अडथळा.
घसा कोरडा पडणे.
अस्वस्थ वाटणे.
पल्स रेटमध्ये वाढ.
काळे जिरे :

काळ्या जिऱ्यामध्ये असणारे अँटिइंफ्लेमेटरी गुण अस्थमावरील इलाजाकरता फायदेशीर ठरू शकतात. याचा वापर ब्रोंकायटिसच्या इलाजाकरताही केला जाऊ शकतो. याचा वापर करण्यासाठी अर्धा चमचा काळ्या जिऱ्याचे तेल , एक चमचा मध , एक कप गरम पाणी याची आवश्यकता आहे. यासाठी पाण्यात काळ्या जिऱ्याचे तेल आणि मध मिसळा. नंतर हे मिश्रण नाश्ताच्या आधी आणि रात्री जेवणानंतर प्यावे. चांगल्या रिझल्टसाठी हे मिश्रण 40 दिवसांकरिता प्यावे.
मध :

मध अस्थमाच्या लक्षणांना कमी करण्यासाठी मदत करते. यासोबतच आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मधाची मदत होते. याचा वापर करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून हे हळूहळू प्यावे. झोपण्यापूर्वी एक चमचा मधात थोडीशी दालचिनी पावडर मिसळून खावी. हे मधाचे पाणी झोपण्यापूर्वी दिवसातून तीन वेळा प्यावे आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी मध आणि दालचिनीचे मिश्रण खावे.
हळद :

अस्थमाच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही हळदीचे पाणीही पिऊ शकता. 10 ते 15 दिवस तुम्ही दररोज तीन वेळा हे हळदीचे पाणी पिऊ शकता. हळदीमध्ये करक्यूमिन असते जे अस्थमावरील उपाय म्हणून फायदेशीर ठरू शकते.
लसूण :

लसूण आपल्या फुप्फुसांमध्ये जमलेला कफ साफ करण्यास मदत करते. ज्यामुळे अस्थमांच्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळू शकतो. अस्थमाच्या लक्षणांना कमी करण्यासाठी लसूण कळ्या दुधात उकळाव्यात आणि त्यांचा काढा करून प्यावा. हा काढा दिवसातून एकदा पिणेही फायदेशीर ठरू शकते.
आले :

ताजे आले किसून त्याला गरम पाण्यात टाकावे. यानंतर याला गाळून घ्यावे. नंतर त्यात मध मिसळावे. अशाप्रकारे हर्बल काढा तयार आहे. हा तुम्ही रोज सकाळी पिऊ शकता. अस्थमाकरता हा सर्वात सामान्य घरगुती उपचार आहे. तुम्ही दररोज आल्याचे तुकडेही चावून खाऊ शकता.
हेही वाचा : Bad Breath Remedies : मुखदुर्गंधी घालवा या उपायांनी
Edited By – Tanvi Gundaye