आपली स्किन सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करत असतो. चेहऱ्यावर कोणतेही फेस पॅक लावण्यापूर्वी त्वचेचा प्रकारानुसार आणि घटकांचा विचार करणे गरजेचे आहे.काही फेस पॅक त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, विशेषतः जर त्यात केमिकल्स किंवा हार्श घटक असतील.आज आपण जाऊन घेऊयात कोणते फेस पॅक चेहऱ्यावर लावू नये.
हार्श केमिकल असलेले फेस पॅक
ब्लीच, सल्फेट्स किंवा पॅराबेन्स असलेले फेस पॅक त्वचेला नुकसान करू शकतात. या फेस पॅकमुळे आपली त्वचा खराब होऊ शकते. अॅलर्जी किंवा कोरडेपणा वाढवू शकताे.
बेसन आणि लिंबाचा जास्त प्रमाणातील वापर
लिंबामध्ये अॅसिड असते, जे संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. रोजच्या वापराने त्वचा कोरडी होऊ शकते आणि सनबर्नची शक्यता वाढते.
अतिशय गरम किंवा अतिशय थंड पदार्थ
गरम तेल, उकळते पाणी किंवा बर्फ थेट त्वचेवर लावल्याने त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
बेकिंग सोडा किंवा टूथपेस्ट युक्त फेस पॅक
बरेच लोक फेस पॅक म्हणून बेकिंग सोडा किंवा टूथपेस्टचा फेसपॅक म्हणून वापर करतात. बेकिंग सोडा त्वचेचे नैसर्गिक पीएच बॅलन्स बिघडवतो, ज्यामुळे कोरडेपणा आणि चट्टे येऊ शकतात. टूथपेस्टमधील केमिकल्स त्वचेला जळजळ आणि अॅलर्जी देऊ शकतात.
अॅलर्जी होण्याची शक्यता असलेले घटक
जर तुम्हाला कोणत्याही घटकाची अॅलर्जी असेल जसे की दूध, हळद, मध, स्ट्रॉबेरी, अंडं हे घटक टाळा. वापरण्याआधी त्वचेच्या लहान भागावर चाचणी घ्या.
महत्वाच्या टिप्स
- नैसर्गिक फेस पॅक वापरत असाल, तुमच्या त्वचेला मॅच होतात का ते आधी तपासून घ्या.
- कोणत्याही नवीन पदार्थाचा आधी “पॅच टेस्ट” करा.
- कोपराच्या आतील बाजूला लावून तपासा.
हेही वाचा : Beauty Tips : या होममेड उपायांनी हटवा टॅनिंग
Edited By : Prachi Manjrekar