दह्यासोबत ‘हे’ ५ पदार्थ खाणे टाळा, फायद्याऐवजी होईल तोटा

दह्याचं सेवन करणं हे आरोग्यसताही उत्तम असतं. दही शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. काही ठराविक पदार्थांसोबत दही खाणं हे शरीरासाठी घातक असतं.

आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी योग्य आणि सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचप्रमाणे दही खाणं किंवा दह्याचं सेवन करणं हे आरोग्यसताही उत्तम असतं. दही शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. दह्याच्या गुणधर्मांमुळे डॉक्टर सुद्धा दही खाण्याचा सल्ला देतात. दह्याच्या सेवनाने शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर दात आणि हाडं सुद्धा दह्याच्या सेवनाने बळकट बनतात. त्याशिवाय दही खाल्ल्याने हृदय सुद्धा निरोगी राहते. पण हे जसे दह्याचे फायदे आहेत त्याप्रमाणे दही हे विशीष्ट पदार्थांसोबत खाल्ल्याने त्याचा प्रकृतीला तोटा होतो. दही शरीरासाठी उत्तम असलं तरीही काही ठराविक पदार्थांसोबत दही खाणं हे शरीरासाठी घातक असतं.
जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत ज्या सोबत दही खाल्ल्याने ते शरीराला अपायकारक ठरू शकते.

हे ही वाचा – रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

 

कांदा आणि दही

काही जण जेवण करते वेळी कांदा आणि दही खातात. पण कांदा आणि दही एकत्र खाल्ल्याने त्याचा प्रकृतीवर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे कांदा आणि दह्याचे एकत्र सेवन करणे तात्काळ थांबविले पाहिजे.

 

मासे आणि दही

मासे आणि दही यांचे एकत्र सेवन करणे आरोग्यसाठी हानिकारक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. मासे आणि दही एकत्र खाल्ले गेले तर तर पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे खाणे टाळा

 

गरम पदार्थासोबत दही खाऊ नये

दही शरीराला थंड ठेवण्याचे काम करत असते आणि दह्यात काही गरम पदार्थ घालून खाल्ले तर त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो. थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाल्ल्याने दात कमजोर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते खाणे टाळा.

 

आंब्यासोबत दही खाणे टाळा

आंबा आणि दुधाचा मिल्क शेक अनेकजण उन्हाळ्यामध्ये आवडीने पितात. पण जर का आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो त्याचबरोबर ते पचनासाठी जड जाते.

डाळींसोबत दही खाणे टाळा

दही आणि उडदाची डाळ यांचे एकत्र सेवन ऐकल्याने त्याचा तुमच्या पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. त्याच बरोबर ऍसिडिटी किंवा पोट फुगणे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आणि जर का तुम्हाला हे दोन्ही पदार्थ खायचे असतील तर त्यांच्या सेवनामध्ये काही वेळाचं अंतर ठेवा आणि मग खा

हे ही वाचा – कणिक मळताना वापरा या टिप्स, पोळी होईल मऊ लुसलुशीत

ही सर्व माहिती घरगुती उपचार पद्धतींवर आधारित आहे. या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरेल.