काही विशिष्ट पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने अपचन, ऍसिडिटी, पोटदुखी आणि इतर पचनासंबंधी त्रास होऊ शकतात. रिकाम्या पोटी काेणतेही पदार्थ खाल्याने पोटातील अॅसिडिची पातळी वाढते आणि पोटदुखी, गॅस, छातीत जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांचे सेवन रिकाम्यापोटी करू नये.
चहा आणि कॉफी
बऱ्याच लोकांना रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. यामुळे ऍसिडिटी गॅस होऊ शकतो.यातील कॅफिनमुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.
केळी
केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, त्यामुळे रक्तातील मॅग्नेशियमची पातळी अचानक वाढू शकते आणि हृदयावर ताण येऊ शकतो. त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी केळी खाऊ नये.
संत्र, मोसंबी आणि इतर फळे
रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने पोटाच्या समस्या, गॅस, पोटदुखी, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
दही आणि इतर आंबट दुग्धजन्य पदार्थ
रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास आम्ल निर्मिती वाढते आणि त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.आंबट पदार्थांमधील अॅसिड पोटातील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अॅसिडशी मिसळून पोटदुखी आणि गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
तिखट आणि मसालेदार पदार्थ
रिकाम्या पोटी मसालेदार, तिखट पदार्थ खाल्यास पोटाचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे ॲसिडिक रिॲक्शन होतो आणि पोटात पेटके येण्यास सुरूवात होते. मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे अपचनही होऊ शकते. त्यामुळे सकाळी अंशपोटी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
गोड पदार्थ
रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे थकवा आणि ऊर्जा कमी होते. याशिवाय आळस, चिडचिड होणे, सूज आणि अपचन होणे, लठ्ठपणा वाढणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांचा स्क्रीनटाइम असा करा कमी
Edited By : Prachi Manjrekar