योग्य आहार हा उत्तम आरोग्यासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळेच कोणती गोष्ट कधी खावी, याचे काही नियम आहेत. अनेकदा आपल्याला भूक लागलेली असते. अशा वेळी आपण रिकाम्या पोटी वाटेल ते खातो. मात्र, रिकाम्या पोटी काहीही खाणे धोकादायक ठरू शकते. विशेषत: सकाळी जेव्हा तुम्हाला तुमच्या दिवसातील सर्वात आरोग्यदायी नाश्ता करण्याची गरज असते. आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यांचे सेवन तुम्ही सकाळी उठल्यानंतरही करू नये.
मसालेदार पदार्थ
बरेच लोक सकाळी उठून नाश्त्यात समोसे, कचोरी, भजी, यासारखे मसालेदार पदार्थ खातात. मात्र, सकाळच्या नाश्त्यात अशा प्रकारचे मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे पोटात जळजळ, अॅसिडिक रिअॅक्शन आणि पोटात दुखणे या समस्या होऊ शकतात
दही आणि लस्सी
सकाळी उठल्यानंतर चुकूनही दह्याचे सेवन करू नये. दह्याचे सेवन आयुर्वेदात सक्त मनाई आहे कारण ते आपल्या शरीरात श्लेष्मा तयार करण्याचे काम करते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चुकूनही दही किंवा लस्सीचे सेवन करू नका.
थंड पाणी
जर तुम्हाला सकाळी उठल्यावर थंड पाणी प्यायला आवडत असेल तर ही चूक पुन्हा करू नका. हे तुमच्या शरीरातील उष्णता खराब करू शकते आणि तुमची ऊर्जा पातळी देखील कमी करू शकते. म्हणूनच सकाळी उठल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका.
गोड नाश्ता
रिकाम्या पोटी नाश्त्यात गोड पदार्थ खाणे टाळा. जर तुम्ही गोड नाश्ता केला तर त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच शिवाय शरीरातून ऊर्जा लवकर निघून जाते. त्यामुळे काही तासांनी भूक लागते.
चहा किंवा कॉफी
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात गॅस आणि ब्लॉटिंगची समस्या होते. त्याचबरोबर सकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोल हार्मोन वाढतो. ज्यामुळे तणावाची पातळी वाढते. तुम्ही जर चहा किंवा कॉफीचे एडिक्ट असाल तर सकाळी उठल्यानंतर तीन ते चार तासांनीच चहा किंवा कॉफी प्या.
व्हाईट ब्रेड
ब्रेड हा नाश्त्यात खाल्ला जाणारा सामान्य पदार्थ आहे. ते झटपट तयार होत असल्याने लोक सहसा ते खातात. पण व्हाईट ब्रेड खाल्ल्याने वजन खूप वाढते. व्हाईट ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट असते, ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते.
हेही पहा :
Edited By : Nikita Shinde