एखादा सण असो किंवा पार्टी तेव्हा महिला मेकअप करतात. मेकअप केल्याने महिला अधिक सुंदर दिसतातच. मात्र तुम्हाला माहितेय का, तुमचा मेकअप किट एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत शेअर केल्याने त्याचे साइड इफेक्ट्स काय होऊ शकतात?
खरंतर प्रत्येकाचा स्किन टाइप वेगवेगळा असतो. त्यामुळे गरजेचे असते की, जे प्रोडक्ट्स तुम्हाला सूट होईल तोच वापरावा. अन्यथा मेकअप किट शेअर केल्यानंतर त्यामधील प्रोडक्ट्स वापरल्यास काय समस्या होतात हे पाहूयात.
-बॅक्टेरियल इंन्फेक्शन
आपले डोळे अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या महिलेचे काजळ किंवा आय लाइनर वापरत असाल तर बॅक्टेरियल इंन्फेक्शन होण्याचा धोका असतो. असे झाल्यास डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे अशा समस्या होऊ शकतात.
-हाइजिनचा प्रश्न उपस्थितीत होतो
खरंतर सर्व स्किन केअर मेकअप ब्रश आणि टूल्सला क्लिन करावे असा सल्ला दिला जातो. मात्र यावेळी काही गोष्टींची काळजी न घेतल्यास मेकअप किट युज केल्यानंतर इंन्फेक्शन होऊ शकते.
-लिप्स प्रोडक्ट्स आणि होणारे व्हायरल इंन्फेक्शन
कोणासोबत ही तुमचे लिप्स प्रोडक्ट्स शेअर करू नका. यामुळे कोल्ड सोर्स म्हणजेच तोंड येण्यास कारणीभूत असणारे व्हायरस हे लिप्सवर अधिक वेळ अॅक्टिव्ह राहतात.
हेही वाचा- चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी दूधात मिक्स करा ‘या’ गोष्टी