घरलाईफस्टाईलSide Effects of Pomegranate: 'या' आजारात डाळिंबाचे सेवन करताना सावधान!

Side Effects of Pomegranate: ‘या’ आजारात डाळिंबाचे सेवन करताना सावधान!

Subscribe

लाल रंगाची डाळिंब पाहण्यास जेवढी सुंदर आहे तेवढीच ती खाण्यासही स्वादिष्ट आहे. डाळिंबाचे फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. डाळिंब (Pomegranate) या फळाचे सेवन आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे. तब्येत सुदृढ राहावी, निरोगी राहावी यासाठी डाळिंबाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोहन, फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत. डाळिंबाच्या रसापासून त्याच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. डाळिंबाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच हृदयरोगापासून संरक्षण होते. डाळिंब त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासह डाळिंबाच्या सेवनाने मुरुमांपासून मुक्ती मिळते, तसेच चेहऱ्यावर चमक येते. अशा उपयुक्त डाळिंबाचे सेवन काही लोकांसाठी नुकसानदायक देखील ठरू शकते. डाळिंब कोणत्या लोकांना हानिकारक ठरू शकते वाचा सविस्तर…

कमी रक्तदाब असल्यास

तुम्हाला जर कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही डाळिंब खाणं टाळावे. डाळिंबाचा थंडावा आणि त्याचा परिणाम रक्त परिसंचरण मंद करतो, ज्यामुळे रक्तदाब आणखी खाली येतो.

- Advertisement -

खोकला असेल तर 

सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल अशा लोकांनी डाळिंबाचे सेवन करणं टाळावे. थंड असल्याने डाळिंबामुळे तुमचा संसर्ग आणखी वाढू शकतो. विशेषतः खोकवा, कफ असलेल्या लोकांनी डाळिंबापासून दूर रहावे.

गॅस असेल तर 

ज्या लोकांना जठराची समस्या आहे त्यांनी डाळिंब खाऊ नये. डाळिंब खाण्याच्या थंड परिणामामुळे अन्न नीट पचत नाही, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते.

- Advertisement -

त्वचेचा अॅलर्जी असल्यास 

जे लोक त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असतील अशा लोकांनी डाळिंबाचे सेवन करू नये. त्वचेची अॅलर्जी असल्यास त्या दरम्यान डाळिंबाचे सेवन केल्याने लाल पुरळ येण्याची समस्या येऊ शकते.

नैराश्यात असाल तर..

जर तुम्ही नैराश्यात असाल आणि त्याचे औषध घेत असाल किंवा कोणत्याही मानसिक आजाराने ग्रस्त असाल तर डाळिंबाचे सेवन टाळा. जर अशा रोगावर औषध घेत असलेल्या लोकांनी डाळिंब खाल्ले तर रासायनिक प्रतिक्रियेचा धोका वाढू शकतो.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -