Friday, June 2, 2023
घर मानिनी मीठ टाळा, ह्रदय सांभाळा

मीठ टाळा, ह्रदय सांभाळा

Subscribe

आहारात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका जास्त असतो. त्यामुळे आहारातील मिठाचे सेवन नियंत्रित केल्यास हृदयाच्या समस्यांचा धोका टाळणे शक्य होते. दरम्यान आहारातील मिठाचे प्रमाण किती असावे आणि त्यातून ह्रदयाची काळजी कशी घ्यावी याबाबत एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी माहिती दिली आहे.

तणाव, धुम्रपान, व्यायामाचा अभाव आणि अतिरिक्त प्रमाणात मिठाचे सेवन हे हृदयावर परिणाम करू शकते. उच्च सोडियमयुक्त आहार हा एक दुर्लक्षित घटक असतो ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवतात. विविध अभ्यासांनुसार, दररोज 2.5 ते 3 ग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन हे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करेल.

उच्च सोडियमयुक्त आहाराचे सेवन आणि हृदयाच्या समस्या

- Advertisement -

हल्ली बदलत्या जीवनशैलीबरोबरच आहाराच्या सवयी देखील बदलल्या आहेत. सोडियमचे प्रमाण अधिक असलेला आहाराचे सेवन, प्रक्रिया केलेले तसेच हवाबंद डब्यातील पदार्थ आणि जंक फूडचे सेवन करतात. आहारातील सोडियमचे वाढते प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. केवळ हृदयाच्या समस्याच नाही तर जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने मूत्रपिंडाचे आजार, किडनी स्टोन, ऑस्टिओपोरोसिस, वजन वाढणे आणि सूज येणे या देखील समस्या उद्भवू शकतात.

निरोगी हृदयाची खास टिप्स

1. पिझ्झा, पास्ता, समोसा, वडा, रेडिमेड सूप, लोणचे आणि चिप्स यांचे सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

2. ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

3. शक्यतो घरी शिजवलेले अन्नाचे सेवन करा.

4. पदार्थ विकत घेताना त्यातील मीठाचे पोषण मूल्य तपासा आणि मगच ते खरेदी करा.

6. बरेच लोक केवळ कॅलरी आणि फॅट्स याकडे लक्ष देतात आणि सोडियमच्या प्रमाणाकडे मात्र दुर्लक्ष करतात. रोजच्या आहारातील मीठ प्रमाण कमी करा.

7. पराठा, थेपला किंवा पिझ्झासोबत सॉस खात असाल तर त्याचे प्रमाणही मर्यादित ठेवा.


सावधान! सकाळच्या नाश्त्यामध्ये कधीही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

- Advertisment -

Manini